काँग्रेस गर्विष्ठ पक्ष : मायावती

विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती होणार नसल्याचे बसप अध्यक्ष मायावतींचे विधान

 

वृत्तसंस्था, ३ ऑक्टोबर

‘ काँग्रेस पक्ष हा गर्विष्ठ असून, आम्ही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची युती करू इच्छित नाही. राजस्थान आणि मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू’, असे बसप प्रमुख मायावती यांनी जाहीर केले आहे.

काँग्रेस हा गर्विष्ठ पक्ष असून त्यांच्याशी युती करावी असा आमचा विचार नाहीच, अशा मायावती आज म्हणाल्या. यामुळे ‘बसप-काँग्रेस’ यांची युती यावर होणाऱ्या संभावित चर्चांना आता पूर्ण विराम मिळाले आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील येत्या विधानसभा निवडणुकींत बहुजन समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

त्या पुढे अशाही म्हणाल्या की, ‘काँग्रेसला वाटत असते की ते स्वतः एकटे भाजपला हरवू शकतात. मात्र ते हे विसरले आहेत की लोकांनी त्यांच्याही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना अजून माफ केलेले नाही. दिग्विजय सिंग सारख्या वरिष्ठांनाच आमची युती नको असल्याचे दिसते.’

एएनआयच्या वृत्तानुसार, त्या अशाही बोलल्या की, ‘ काँग्रेस आणि बसप यांच्या युतीसाठी सोनिया आणि राहुलजीचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, मात्र काँग्रेसमधील इतरांना मात्र हे मान्य नाही.’

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here