तरीही कमळच !

देश आणि राज्यपातळीवर आता जर निवडणूक झाल्या तर भाजपच यशस्वी ठरेल असे एबीपीमाझा आणि सी-व्होटर च्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

 

मुंबई, ५ ऑक्टोबर

आता जर लोकसभा निवडणूक झाल्या तर केंद्रासोबत राज्यातही भाजपच जिंकेल असा अंदाज ‘एबीपी माझा आणि सी-व्होटर’च्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

देशपातळीवर आणि राज्यातही जर आता निवडणूक झाल्या तर लोक भाजपला कौल देतील, अंदाज एबीपीमाझा आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. या निवडणूक झाल्यास राज्यात भाजपला २२ जागा मिळतील असे दिसून आले आहे. या पाहणीतून असेही दिसून आले आहे की, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व महत्त्वाचे पक्ष स्वतंत्र जरी लढले, तरी  भाजपाला २२ जागा मिळू शकतात.

काँग्रेस गर्विष्ठ पक्ष : मायावती

दरम्यान, शिवसेनेने यापुढील निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठा फटका शिवसेनेला या सर्वेक्षणातून दिसत आहे. शिवसेना जर स्वतंत्र लढला तर अवघ्या ७ जागा मिळतील. शिवसेनेने ही भूमिका कायम ठेवल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. सगळे पक्ष जर स्वतंत्र लढले, तर त्याचा फायदा भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीलाही होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेेसला ११ तर राष्ट्रवादीला ८ जागांवर समाधान मानावे लागेल. २०१४ मध्ये या दोन्ही पक्षांना अनुक्रमे २ व ४ जागांवर यश प्राप्त झाले होते.

 

◆◆◆

 

रोजच्या महत्वपूर्ण घडामोडी आणि माहितीपर मजकुरांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्युबवर. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here