मध्यप्रदेशातही शिवसेना स्वबळावर लढणार !

मध्यप्रदेशमधील सर्वच जागांवर शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे  जाहीर झाले आहे. उमेदवारांची पहिली यादीही पक्षाने जाहीर केली आहे.

 

वृत्तसंस्था,

भोपाळ, १७ ऑक्टोबर

स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा पुढेही सुरू ठेवत मध्यप्रदेशमध्येही विधानसभेच्या २३०ही जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्ष आता  मध्यप्रदेशमध्येही विधानसभेच्या सर्व २३० जागा स्वबळावर लढणार असल्याची माहिती, शिवसनेचे मध्यप्रदेश प्रमुख ठाणेश्वर महावर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मध्यप्रदेशमध्ये शिवसेनेने विधानसभा उमेदवारांच्या २० नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची दुसरी यादी २५ ऑक्टोबरला रोजी जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असून सत्ताधारी पक्षाला चांगलाच धक्का देणार असल्यायाचा विश्वासही महावर यांनी व्यक्त केला आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here