२१ ऑक्टोबरपासून कल्याण-डोंबिवलीत पाणीकपात सुरू

येत्या मंगळवारपासून कल्याण डोंबिवलीमध्ये वर्षभरासाठी दर मंगळवारी पाणीकपात  सुरू होणार आहे.

 

गोपाळ दंडगव्हाळे
कल्याण दि. १७ऑक्टोबर

पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजनानुसार येत्या मंगळवारपासून कल्याण डोंबिवलीत पाणीकपात सुरू होणार आहे. पुढील वर्षभरासाठी दर मंगळवारी ही पाणीकपात केली जाणार आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने पुढील वर्षभरासाठी केलेल्या पाण्याच्या नियोजनानुसार येत्या मंगळवारपासून कल्याण डोंबिवलीत पाणीकपात केली जाणार आहे. ही पाणीकपात पुढील वर्षभरासाठी, म्हणजेच २१ ऑक्टोबर २०१८ ते १५ जुलै २०१९ पर्यंत दर मंगळवारी केली जाणार आहे. सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ असा चोवीस तास कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाची ही पाणीकपात लागू होण्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीत काही ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.  यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच सुरु होणाऱ्या या पाणीकपातीमुळे पुढील वर्षीच्या मान्सूनच्या आगमनापर्यंत कल्याण डोंबिवलीकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.

 

◆◆◆

 

पाठवा तुमच्या परिसरातील विविध घडामोडींची आणि उपक्रमांची माहिती writeto@marathibrain.com वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here