मोठा निर्णय: घटस्फोट प्रकरण प्रलंबित असतानाही वैध असणार दुसरे लग्न!

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट

घटस्फोटासंबंधीचा अर्ज न्यायालयात प्रलंबित असेल आणि एखाद्याला दुसरं लग्न करायचे असेल, तर ते आता शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात हा एक मोठा निर्णय आज दिला आहे.

 

घटस्फोटाचे प्रकरण प्रलंबित असतानाही दुसरे लग्न वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 

‘हिंदू मॅरेज अॅक्ट’नुसार पहिल्या पत्नीपासून घेतलेल्या घटस्फोटाचेे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास पती किंवा पत्नी दुसरं लग्न करू शकत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या नियमात आज मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असेल आणि तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल, तर आता तसं करता येणार आहे.

न्यायालयानं घटस्फोटाचं प्रकरण प्रलंबित असल्यास दुसरं लग्न करण्याची मुभादिली आहे. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे व न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठानेे ‘हिंदू मॅरेज अॅक्ट’नुसार घटस्फोटाचे प्रकरण प्रलंबित असताानाही दुसरे लग्न करण्याची मुभा असण्याचा हा निर्णय दिला आहे.

 

पार्श्वभूमी:-

एका प्रकरणात, घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पतीने पहिल्या पत्नीशी सामंजस्य करून खटला मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यादरम्यान त्याने दुसरे लग्नही केले. उच्च न्यायालयाने त्याने केलेलं दुसरे लग्न बेकायदेशीर ठरवले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळत पतीने केलेले दुसरे लग्न वैध ठरवले आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here