राज्यशासनाची ‘शेतकरी अपघात विमा योजना’

farmer

‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’तर्फे महाराष्ट्र शासनाकडून दोन लाखांपर्यंतचा अपघात विमा शेतकऱ्यांना मोफत दिला जातो. ह्या विम्यासाठीचे फॉर्म तुमच्या गावाच्या किंवा तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडून उपलब्ध होतात. ही विमा योजना पूर्णतः मोफत आहे.

खूपदा योजनांची योग्य माहिती नसल्याने किंवा कायद्यातील गैरसमज, यांमुळे कुणी सरकारी दरवाजे ठोठावत नाही. पण आपण आपला अधिकार हा घेतलाच पाहिजे.

● योजनेचे स्वरूप :- 

1) शेतात काम करतांना किंवा अपघातात मृत्यू झाल्यास – २ लाख रुपये
2) दोन अवयव निकामी होणे- २ लाख रुपये
3) एक डोळा निकामी झाल्यास- 1 लाख रुपये
4) १ डोळे निकामी होणे – २ लाख रुपये इ.

योजनेमध्ये समाविष्ट अपघाताचे प्रकार: 

– रेल्वे/ रस्ता अपघात.
– पाण्यात बुडून मृत्यू.
– जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा.
– विजेचा धक्का अपघात.
– वीज पडून मृत्यू.
– खून.
– उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू.
– सर्प दंश/ विंचू दंश.
– नक्षलवाद्याकडून हत्या.
– जनावरांच्या हल्याने मृत्यू.
– दंगल.
– अन्य कोणतेही अपघात.

● शेतकरी विमा योजनेसाठी आवश्यक अनुषंगिक कागदपत्रे: 

1) मृत्यू दाखला
2) शव चिकित्सा दाखला
3) स्थळ पंचनामा
4) पोलीस पाटील दाखला
5) FIR कॉपी
6) इंवेस्ट पंचनामा
7) अपंगत्व सर्टिफिकेट

● आवश्यक कागदपत्रे:

१) ७/१२ किंव्हा ८ ‘अ’ किंव्हा 6 ‘ड’ फेरफार
2) शेतकऱ्यांचे वय 10 ते 75
3) शेतकरी स्वतः वाहन चालवत   असेल आणि अपघात झाला तर वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक.

( संदर्भ : महाराष्ट्र शासन निर्णय : शेअवि-2017/प्र.क. 181/11-अ)

http://krishi.maharashtra.gov.in/1246/Gopinath-Munde-Farmers-Accident-Insurance-Schemes

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here