६३% भारतीय इंटरनेटवर करतात फिरण्याचे नियोजन; ‘कायक’चे सर्वेक्षण!

६३% भारतीय कर्मचारी दुपारी इंटरनेट सर्चद्वारे फिरण्याचे नियोजन करत असल्याची माहिती, ‘कायक’ या ट्रॅव्हल सर्च इंजिनने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून समोर आली आहे.

 

 

आंतरजालावर (इंटरनेट) लोक दिवसभर काय शोधत (सर्च) बसतात याबद्दल जाणून घ्यायची प्रत्येकालाच नेहमी उत्सुकता असते. याबाबत अनेक सर्वेक्षणांतून आपल्याला विविध माहितीही मिळत असते. असाच एक आश्चर्यकारक सर्वेक्षण अहवाल ‘कायक’ या पर्यटनाबाबत प्रसिद्ध असलेल्या शोधयंत्राने (सर्च इंजिन) सादर केला आहे.

 

‘कायक’वर शोधल्या गेलेल्या माहितीच्या आधारे, लोक आंतरजालावर सर्वात जास्त काय शोधतात याबाबत एक सर्वेक्षण घेतले गेले. या सर्वेक्षणातून असे माहिती झाले की, ६३ टक्के भारतीय कर्मचारी फिरायला जायच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. ही माहिती सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीतील असली तरी, दुपारी १ ते ३ यावेळी सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे जाणवते. म्हणजेच, दुपारी जेवणानंतर ६३ टक्के भारतीय कर्मचारी इंटेनेटवर फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात.

कायकच्या अहवालानुसार ही माहिती जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ मध्ये शोधल्या गेलेल्या पण जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ साठीच्या फिरण्याच्या नियोजनसंबंधीच्या सर्चवर आधारित आहे.

 

भारतीय लोकांच्या या टक्केवारीसोबतच, कर्मचारीवर्ग फिरायला जाण्यासाठी कोणत्या ठिकाणांना जास्त प्राधान्य देतात याविषयीची माहितीसुद्धा अहवालात प्रकाशित झाली आहे. यामध्ये लोकांची सर्वाधिक पसंती दुबईला मिळाली आहे. तब्बल ९४टक्के लोक दुबईला फिरायला जाण्यास प्राधान्य देतात. त्यानंतर बँकॉक,सिंगापूर, बाली, इंडोनेशिया, गोवा इत्यादी ठिकाणांचा क्रम लागतो.

 

या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, सकाळी ९ ते १ पर्यंत विशेष सर्च होत नाही, मात्र दुपारी कार्यालयीन जेवणाच्या वेळी व जेवणानंतर कर्मचारी आंतरजालावर फिरायला जाण्याची ठिकाणे शोधण्यात वेळ घालवतात.

 

◆◆◆

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here