अक्षय होणार ‘पृथ्वीराज’ !

ब्रेनवृत्त | मुंबई

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आगामी चित्रपटात राजा पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारणार आहे.  आज आपल्या 52 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने ही घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाच्या यशानंतर लगेचच आगामी चित्रपटाची घोषणा अक्षयने केली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणाऱ्या अक्षय कुमारचा चित्रपटांचा वेग अद्याप कायम आहे. वर्षातून दोन ते तीन चित्रपट करणाऱ्या अक्षयने तो एका ऐतिहासिक भूमिकेत येणार असल्याची घोषणा केली आहे. आज त्याच्या ५२व्या वाढदिवसानिमित्त अक्षयने आगामी चित्रपटात राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांपासून अक्षयचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतो आहे व सोबतच, त्यामुळे अक्षयही नेहमीच्या चर्चेचा विषय बनला आहे.

स्वप्निल जोशीच्या बहुचर्चित ‘मोगरा फुलला’ ; चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

आगामी चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षयने ट्विटत म्हटले आहे की, “भारतातील शूर आणि पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्या आपल्या शूर, पराक्रमी, महान व्यक्तिमत्त्वांची माहिती लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे.” यशराज फिल्म ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे, तर ‘चाणक्य’ या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी हे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी, म्हणजेच 2020 च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘बिग बॉस’ शिवला जेतेपदासह मिळालं अजून बरंच काही!

सोबतच, संबंधित चित्रपटाच्या माध्यमातून पृथ्वीराज  चौहान यांचे शौर्य सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा झाली आहे, हे माझ्यासाठी विशेष असल्याचेही, अक्षयने म्हटले आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here