आमटे दांपत्य ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये!

जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व त्यांची पत्नी  मंदाकिनी आमटे हे सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) या प्रश्नमंजूषा ‘शो’च्या ‘कर्मवीर’ या विशेष भागामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती  ‘केबीसी’चे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘ट्विटर’वरून ट्वीट करून दिली आहे.

लोकप्रिय ‘रिअॅलिटी शो’ ठरलेला ‘कौन बनेगा करोडपती-१०’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दाम्पत्यांमुळे दहाव्या हंगामाची सुरुवात आगळय़ावेगळय़ा पद्धतीने होणार आहे. या भागाचे शूटिंग नुकतेच मुंबईत पूर्ण झाले आहे. त्याबाबत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.

‘‘डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन महान माणसांच्या सहवासामध्ये राहण्याचे भाग्य मला नुकतेच लाभले आहे. त्यांचे जीवन आणि आदिवासींसाठी करत असलेले काम प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही. असे अत्यंत उल्लेखनीय असे ते काम आहे.

‘केबीसी’च्या ‘कर्मवीर’ या विशेष भागाचे प्रक्षेपण ७ सप्टेंबर २०१८ रोजी केले जाणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांचे बंधू विकास आमटे यांनी अमिताभ यांच्या ‘ट्विट’चा स्क्रीनशॉट घेऊन एक ट्वीट करताना हा कार्यक्रम पाहण्याचे सर्वांना आवाहन केले आहे.

 

आम्हाला लिहा (writeto@marathibrain.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here