Monday, July 6, 2020
Home Blog
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पाकिस्तान आपले घाणेरडे हेतू साध्य करण्यासाठी एकही संधी सोडताना दिसत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी छावण्यांमध्ये दहशतवाद्यांनी कोरोना विषाणू पसरविणारे अतिरेकी (फिदाईन) तयार केले आहेत. या अतिरेक्यांद्वारे जास्तीत जास्त घुसखोरी करून सीमेपलीकडे असलेल्या या कोरोना-संक्रमित अतिरेक्यांना भारतात ढकलण्यास पाकिस्तानी सैन्य सतत प्रयत्नशील आहे, अशी माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने जून महिन्यात एलओसीवर 418 वेळा युद्धबंदीचे...
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे मागील आठवड्यात 'भारत क्षयरोग अहवाल २०२०' (India TB Report 2020) जाहीर करण्यात आला. या अहवालातील नोंदी आणि त्यासंबंधी निगडित विविध मुद्यांचे विश्लेषण वाचा या ब्रेनविश्लेषणात. ब्रेनविश्लेषण | क्षयरोग अहवाल २०२० केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoFHW) नुकताच (२४ जून) 'भारत क्षयरोग अहवाल २०२०' (India TB Report 2020)  प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 2019 मध्ये...
२०१९-२० या वर्षासाठीचा 'नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे. ब्रेनवृत्त | मुंबई राज्य शासनामार्फत देण्यात येणारा 'नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड...
ब्रेनवृत्त | मुंबई राज्यात 'कोव्हिड-१९' विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे स्वतंत्र कृती दल (Task Force) नेमण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या कृती दलात डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार असून, 'कोव्हिड-१९'ला नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे...
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांत सहभागी होण्यासाठी परवानगी मिळणार नाही. तसेच भागीदारीच्या माध्यमातूनही कोणत्याच चिनी कंपनीला देशातील रस्तेनिर्माण क्षेत्राशी संबंधित काम दिले जाणार नाही, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने पाऊल...
ब्रेनविश्लेषण | अनुराधा धावडे भारतीय नागरिकांनी चीनच्या मालावर बहिष्कार टाकल्याच्या घटनांनंतर भारताने अखेर चीनमध्ये निर्मित ५९ मोबाईल अनुप्रयोगांवर (Mobile Applications) बंदी घातली. चीनला उत्तर देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. साध्या शब्दांत सांगायचे तर, या ऍप्सवर वापरकर्त्याची संवेदनशील माहिती मिळविणे, हेरगिरी करणे, गोपनीयतेशी तडजोड करणे, भारताचा अपप्रचार आणि राष्ट्रीय हितासाठी धोका असल्याचा आरोप आहे. त्यामुळे भारताने चीनचे हे अप्लिकेशन्स  बंद केले...
ब्रेनवृत्त, ३० जून चीनमधील वूहान शहरात उगम पावलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण आहे. आता याच चिंतेत भर घालणारी बातमी पुन्हा एकदा चीनमधून आली आहे. चीनमध्ये डुकरांमध्ये इन्फ्लूएंझाचा ताप (फ्लू) पसरवणारा एक नवीन विषाणू शास्त्रज्ञांना सापडला आहे. तसेच या विषाणूमुळे नवी जागतिक साथ पसरवण्याची क्षमता असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. 'प्रोसेडींग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स' या विज्ञानविषयक...
विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रब्बी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.    ब्रेनवृत्त | नागपूर विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाने रबी हंगामातील धान खरेदीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती राज्याचे...
हैदराबाद स्थित 'भारत बायोटेक कंपनी'ने 'कोव्हिड-१९'वरील लस तयार केली असून, या लसीची जुलै महिन्यात माणसांवर चाचणी होणार आहे. 'कोव्हॅक्सिन' (Covaccine) असे या लसीचे नाव आहे. भारत बायोटेक कंपनीने ही लस 'राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था' (National Institute of Virology) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) यांच्या एकत्रित प्रयत्नांतून तयार केली आहे.    ब्रेनवृत्त |  हैद्राबाद भारतातील हैदराबाद स्थित 'भारत बायोटेक कंपनी'ने 'कोव्हिड-१९'वरील लस तयार...
ब्रेनरंजन, मुंबई मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कोहॉलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने  सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च चित्रीकरणाचा प्रवास सुरु करताना सई खूप उत्साहित होती. सईने नव्याने सुरुवात करताना तिचे मनोगत व्यक्त केले आहे आणि दर्शक-चाहत्यांकडून शुभेच्छाही मागितल्या आहेत. सई म्हणाली, “पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत. एकीकडे...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!