पॅन-आधार जोडणीस आठव्यांदा मुदतवाढ!

केंद्रीय प्रत्यक्षकर मंडळाने (सीबीडीटी) कायस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आधारशी जोडणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ वरून ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवली आहे. पॅन-आधार जोडणी प्रक्रियेसाठी करण्यात आलेली ही सलग आठवी मुदतवाढ आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

केंद्रीय प्रत्यक्षकर मंडळाने (सीबीडीटी) कायस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आधारशी जोडण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. आधी नेमलेल्या ३१ डिसेंबर २०१९ ची मुदत आता ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. पॅन-आधार जोडणी प्रक्रियेत ही सलग आठवी मुदतवाढ आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आधार क्रमांक आणि पॅन एकमेकांशी संलग्न करण्याच्या प्रक्रियेस सलग आठव्यांदा मुदत वाढ दिली आहे. एक आदेश जारी करून मंडळाने पॅन-आधार जोडणीची ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची मुदत वाढवून ३१ मार्च २०२० केली आहे. “प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या विभाग १३९अअ च्या उपविभाग २ नुसार पॅन-आधार आंतरजोडणीच्या प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०१९ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे”, असे मंडळाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या मुदतवाढी संदर्भात प्राप्तिकर विभागासाठी विविध धोरण आखणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्षकर मंडळाने अधिसूचनाही जाहीर केली असल्याचे म्हटले आहे.

आयकर भरण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य

मंडळाने पॅन-आधार आंतरजोडणी (PAN-Aadhaar Interlinking) प्रक्रियेत ही आठव्यांदा केलेली मुदतवाढ आहे. याआधी ३१ डिसेंबर २०१९ ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. प्रत्यक्ष कर कायद्याच्या विभाग १३९अअ(२) च्या अंतर्गत ३१ जुलै २०१७ पर्यंत ज्यांच्याकडे कायस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आणि जे आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहेत, अशा सर्वांनी पॅन आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा : ‘मास्क्ड आधार’ म्हणजे काय?

सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधारविषयी दिलेल्या महत्त्वपूर्ण निवडण्यात केंद्रीय शासनाची प्रमुख योजना असलेल्या ‘आधार’ला संवैधानिकरित्या वैध असल्याचे म्हटले होते. तसेच, हे जीवमितीय ओळखपत्र (बायोमेट्रिक आयडी) आयकर परतावा दाखल करण्यासाठी व पॅन कार्ड वाटपासाठी अनिवार्य आल्याचेही न्यायालयाने म्हटले होते.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here