सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; जुलैमध्ये होणार परीक्षा

प्रातिनिधिक छायाचित्र

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE : Central Board of Secondary Education) वर्ग दहावी आणि बारावी परीक्षांच्या उर्वरित पेपरच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, केवळ ईशान्य दिल्ली भागातील दहावीच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या जातील. तर, बारावीच्या परीक्षा मात्र संपूर्ण देशभरात घेतल्या जातील. ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या या सर्व परीक्षा सकाळी साडेदहा ते  दुपारी दीड  या वेळेत घेतल्या जातील.

याआधी, ५  मे रोजी आयोजित विद्यार्थ्यांच्या चर्चासत्रात बोलताना पोखरीयाल यांनी दहावी बारावीच्या उर्वरित परीक्षांबाबत माहिती दिली होती. सीबीएसई दहावी आणि बारावीचे उर्वरित परीक्षा १  ते १५  जुलै दरम्यान होतील. परीक्षांच्या तारखा जाहीर करतांना विद्यार्थ्याना तयारी करायला पुरेसा वेळ मिळेल. या तारखा जाहीर केल्यामुळे आता विद्यार्थी आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करु शकतील.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत बसण्यासाठी ७५% हजेरी बंधनकारक

सोबतच, ह्या परीक्षा घेतांना शारीरिक अंतराच्या नियमांचे पूर्ण पालन केले जावे, अशा सूचना सीबीएसईला देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सीबीएसईच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांपूर्वीच जाहीर होणार होते. मात्र, आणखी काही तांत्रिक बाबींवर विचार करत असल्याचे कारण सांगत आज मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हे वेळापत्रक जाहीर केले.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here