शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाचा ‘वीस कलमी कार्यक्रम’

मराठवाड्यात गेल्या ११ महिन्यांतील ८५५ शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी समोर आली आहे.

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असल्याची कबुली लोकसभेने दिली आहे. विविध राज्यांत होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाने वीस कलमी कार्यक्रम आखले असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

वृत्तसंस्था , नवी दिल्ली

२९ जून २०१९

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा काल लोकसभेत चर्चेचा बनला. देशात शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रणी असल्याचे लोकसभेने काल कबूल केले. तर राज्यनिहाय शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत तेलंगणा, कर्नाटकनंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली.

मराठवाड्यात गेल्या ११ महिन्यांतील ८५५ शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी समोर आली आहे.

देशातील शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने वीस कलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्धार केला असल्याची माहिती काल राज्यसभेत केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. या कार्यक्रमामुळे देशातील शेतकरी आत्महत्या नक्कीच कमी होतील असा दावा त्यांनी केला आहे. बिहार, झारखंड, जम्मू काश्मीर व इतर १३ देशांमध्ये एकही आत्महत्या झाली नसल्याची माहितीही राज्यसभेत देण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘होय ! मी शेतकरी

२०१५ या वर्षात एकूण ८००७ शेतकरी आत्महत्येचे प्रकरण समोर आले होते, त्यांपैकी ३,०३० शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रातून होत्या. २०१४ सालच्या आकडेवारीच्या तुलनेत २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सुमारे १५०० ने वाढले होते. तर, मार्च महिन्यात प्रकाशित आकडेवारी नुसार गेल्या चार वर्षांत तब्बल १२,००० शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असल्याचे वृत्त समोर आले होते.

मराठवाड्यात ११ महिन्यांत ८५५ शेतकरी आत्महत्या !

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या नुकतेच शासनाने ‘पीएम-किसान’ पोर्टलसुद्धा सुरु केले आहे. मात्र, शेतकऱ्यांची आत्महत्या कशी थांबावावी याचे उत्तर अद्याप शासनाला सापडलेले नाही.

 

◆◆◆

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here