निकालांच्या आधी काँग्रेस कार्यकर्त्यांचे हवन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, ११ डिसेंबर

देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर हवन-पूजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या घरासमोर हवन आयोजित केले आहे.

देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतदानाची मतमोजणी आज सकाळीच आठ पासून सुरू झाली आहे. या निकलांकडे सगळ्यांचे लक्ष वेधून आहे. यातच यशाची कामना करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच हवन-पुजनाला सुरुवात केली असल्याचे दिसते. एएनआय ने यासंबंधीचे सचित्र वृत्त प्रकाशित केले आहे.

संबंधित छायाचित्रांत जेष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सचिन पायलट आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या फोटो ठेवण्यात आले असून, त्यांची पूजा होत असल्याचे दिसते. अशाप्रकारे यशाची कामना करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या घरासमोर हवनाचा पूजाविधी आयोजित केला आहे.

दरम्यान, आज सकाळीच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. काही तासांच्या आतच राष्ट्रीय राजकीय वातावरणात कोण महानायक ठरणार हे स्पष्ट होणार आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here