दिल्लीत उभारण्यात आले ‘पहिले स्मॉग टॉवर’

दिल्लीतील हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सामूहिक पाऊल म्हणून लाजपतनगर येथे पहिले स्मॉग टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरचे कार्य सुरू झाले असून, दरदिवशी सुमारे १५ हजार नागरिकांना शुद्ध हवा पुरवण्याची याची क्षमता असल्याचे, सांगण्यात आले आहे.

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

दिल्लीतील प्रदूषित आणि आरोग्यास धोकादायक असलेल्या हवेवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत पहिला स्मॉग टॉवर साकारण्यात आला आहे. दिल्लीच्या लाजपतनगर ट्रेजर्स असोसिएशन आणि खासदार गौतम गंभीर यांच्या पुढाकाराने ही प्रणाली उभारण्यात आली असून, यामुळे परिसरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळवणे शक्य होणार आहे.

दिल्लीतील हवा प्रदूषणाची बाब नवी नाही. मात्र, दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या या गंभीर स्थितीमुळे येथे वास्तव्यास असलेल्या जनजीवनावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (सिपीसीबी) वेळोवेळी दिल्लीतील हवा अतिशय धोकादायक असल्याचे जाहीर केले जाते. त्यामुळे आता या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी दिल्लीकर प्रत्यक्ष पुढे सरसावले आहेत. दक्षिण दिल्लीतील लाजपतनगर येथे शुुद्ध हवेसाठी स्मॉग टॉवर साकारण्यात आले आहे. शहरातील दूषित हवा हा टॉवर ही हवा शुद्ध करणार आहे. लाजपतनगर ट्रेजर्स असोसिएशन आणि खासदार गौतम गंभीर यांच्या पुढाकाराने ही प्रणाली उभारण्यात आली आहे.

समुद्री माशांमध्ये प्लास्टिकचे अंश ; ‘टेरी’चे विशेष अभियान !

राजधानी दिल्लीतील अशा प्रकारचा हा पहिलाच टॉवर आहे. दिवसाला जवळपास 15 हजार नागरिकांना शुद्ध हवा पुरवू शकण्याची क्षमता या टॉवरमध्ये आहे, अशी माहिती संघटनेचे महासचिव अश्वनी मारवाह यांनी दिली आहे. बाहेरची हवा आत खेचून ती शुद्ध करणे आणि शुद्ध केलेली हवा बाहेर टाकण्याची यंत्रणा या स्मॉग टॉवरमध्ये बसवण्यात आली आहे. तसेच, 500 ते 700 मीटर व्यासच्या परिसरातील हवा हा टॉवर शुद्ध करणार आहे.

 

● या स्मॉग टॉवरची वैशिष्ट्ये

– हा टॉवर विजेवर चालणारा असून,  सिलिंडरच्या आकाराचा आहे.

– अडीच लाख ते सहा लाख घनमीटर हवा एका दिवसाला शुद्ध करण्याची या टॉवरची क्षमता आहे.

– या टॉवरच्या एकूण उंची 20 फूट असून, हा स्मॉग टॉवर दिवसाला 15 हजार नागरिकांना शुद्ध हवा पुरवू शकतो.

– या टॉवरसाठी एकूण सात लाख रुपयांचा खर्च आला आहे. तसेच, टॉवरच्या देखभालीचा खर्च 30 हजार रुपये एवढा आहे.

गोव्याच्या रस्त्यांवर ‘इलेक्ट्रिक बस’ची फेरी

दरम्यान, आधीच प्रदूषणाने त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना आता प्रचंड गारठ्याचा सामना करावा लागतो आहे. यामुळे अनेक ठिकाणी या हवामान बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, परिवहन व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. धुके पसरल्याने विमान उड्डाणाला फटका बसला आहे, तर दुसरीकडे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.

 

◆◆◆

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here