मोदी सरकारचा ‘निवडणूक अर्थसंकल्प’ : डॉ. मनमोहन सिंग

मराठीब्रेन वृत्त

नवी दिल्ली, २ फेब्रुवारी

मोदी सरकारने काल संसदेत मांडलेला त्यांचा शेवटचा हंगामी अर्थसंकल्प ‘निवडणूक अर्थसंकल्प’ असल्याचे वर्णन माजी पंतप्रधान व जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी केले आहे. एनडीटीव्ही वाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केलेला हंगामी अर्थसंकल्प हा आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला असल्याचे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहेत. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते बोलत होते. येत्या मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या अर्थसंकल्पाचे परिणाम दिसून येतील. निवडणूक वर्षात मध्यमवर्ग, गरीब व छोटे शेतकरी तसेच ग्रामीण जनतेला सुखावह वाटणारा मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प ‘निवडणूक अर्थसंकल्प’ असल्याचे डॉ. सिंग म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ‘इन्कम टॅक्स गिफ्ट’च्या संबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना देण्यात आलेल्या या सवलतीचा थेट संबंध निवडणूकांशी आहे.’ सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या हंगामी अर्थसंकल्पात होणाऱ्या खर्चाचा समावेश नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जेष्ठ अर्थतज्ज्ञ अजून देशातील केंद्रीय आर्थिक सुधारणा कार्यक्रमांसाठी ते ओळखले जातात.

 

◆◆◆

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here