‘आरोग्य सेतू’ची कार्यपद्धती, सक्तीकरणाची कारणे आणि बरंच काही!

नुकतेच देशातील केंद्रीय, तसेच खासगी कर्मचाऱ्यांना ‘आरोग्य सेतू ऍप’चे वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी चर्चांना इंटरनेटवर उधाण आले आहे. मात्र, केंद्र शासनाने हे अनुप्रयोग वापरणे सक्तीचे का केले, ते कसे काम करते, हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया सविस्तर. 

 

ब्रेनबिट्स | आरोग्य सेतू अनुप्रयोग

केंद्र शासन आणि राज्यांचे शासन ‘कोरोना विषाणू‘च्या साथीचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे केंद्र शासनाने सुरू केलेले ‘आरोग्यसेतू’ या नावाचे मोबाईल अनुप्रयोग (मोबाईल अप्लिकेशन). नुकतेच, भारतात कोरोना विषाणूची माहिती देणारे ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ शासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी फोनमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. सुरुवातील फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच या अनुप्रयोगाचा वापर बंधनकारक करण्यात आला होता.

भारतात २४ मार्चला पहिल्यांदाच केंद्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, ३ एप्रिल रोजी केंद्र सरकारने हे अनुप्रयोग वापरासाठी खुले केले. मात्र, नुकत्यातच करण्यात आलेल्या या ऍपच्या सक्तीमुळे आता याविषयी चर्चांना इंटरनेटवर उधाण आले आहे. मात्र, केंद्र शासनाने हे अनुप्रयोग वापरणे सक्तीचे का केले, हे तुम्हाला माहिती आहे का?

कसे तयार कराल ‘व्हाट्सऍप स्टिकर्स’ ?

● ‘आरोग्य सेतू’ वापराचे सक्तीकरणाचे कारण काय?

‘पत्र सूचना कार्यालय’च्या(पीआयबी) प्रसिद्धिपत्रकातून हे अनुप्रयोग वापरणे सक्तीचे का करण्यात आले आहे, याविषयी सांगितले आहे. केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनी हे अप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करून यात सर्व माहिती भरायची आहे. कर्मचारी या ऍपवर आहेत की नाही, हे त्यांच्या वरिष्ठांनी पहायचं आहे. सोबतच, या ऍपवर धोक्याची पातळी वाढलेली दिसली, तर कर्मचाऱ्यांनी ऑफिसला जाऊ नये, असंही स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे, ऑरेंज आणि रेड झोन घोषित केलेले भाग हे कंटेनमेंट झोनमध्ये येतात. या भागांतील लोकांकडेही हे अनुप्रयोग असावे, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायची आहे. आता हे अनुप्रयोग वापरणे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एकूणच, शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी हे जर ‘कोव्हिड-१९’ग्रस्त किंवा संभावित धोक्याच्या क्षेत्रांत असतील, तर अशांना तत्काळ सूचना देणे व पुढील प्रसार रोखणे, हा यामागील उद्देश आहे. सोबतच, स्थानिक नागरिकांनी या अनुप्रयोगाच्या माध्यमातून ‘कोव्हिड-१९‘ ची माहिती मिळवणे व कळवणे हाही उद्देश आहे.

● वाचा, ‘आरोग्यसेतू’ कसं काम करतं?
– हे अनुप्रयोग मोबाईलवर सुरू करण्यासाठी वापरकर्त्याला (युजर) सर्वात आधी स्वतःचं मूल्यांकन करावं लागतं.

– ऍपवर नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी स्वतःचा मोबाईल नंबर द्यावा लागतो. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून ऍप सुरू करता येते.

– तसेच या अनुप्रयोगात तुमचं लिंग, वय व त्यानंतर परदेश प्रवासाचा इतिहास, सर्दी, खोकला, ताप यासारख्या प्रश्नांची ‘हो किंवा नाही’मध्ये उत्तरं द्यावी लागतात.

– सोबतच, या अनुप्रयोगामध्ये सामाजिक अंतराचं महत्त्व आणि ते कसं पाळायचं, याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here