गुगल करणार भारतात ₹७५,००० कोटींची गुंतवणूक !

गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात तंत्रज्ञानाच्या आधारे चार प्रमुख क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी १० बिलियन डॉलर्सचे (सुमारे ₹७५,००० कोटी) डिजिटलीकरण निधी जाहीर केले, जे पुढील पाच ते सात वर्षांत वापरले जाईल.

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय ‘गुगल‘ने येत्या काळात भारतात तब्बल १० बिलियन अमेरिकी डॉरलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात तंत्रज्ञानाच्या आधारे चार प्रमुख क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी १० बिलियन डॉलर्सचे (सुमारे ₹७५,००० कोटी) डिजिटलीकरण निधी जाहीर केले, जे पुढील पाच ते सात वर्षांत वापरले जाईल.

गुगलद्वारे येत्या काळात भारतात केली जाणारी ही गुंतवणूक संमिश्र पद्धतीने केली जाईल. यामध्ये समभाग गुंतवणूक (Equity Investment), भागीदारी आणि परिचालन संरचना (Partnership & Operational Infra) व परिसंस्था गुंतवणूक (Ecosystem Investment) या मार्गांचा प्रामुख्याने संयुक्त समावेश असेल. ही गुंतवणूक प्रामुख्याने चार क्षेत्रांमध्ये अपेक्षित आहे. यामध्ये १) स्थानिक भाषांमध्ये माहिती उपलब्धीकरण २) भारताशी संबंधित उत्पाद व सेवा उभारणी ३) व्यवसायांचे डिजिटल परिवर्तन आणि ४) सामाजिक हितासाठी तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेची तरतूद यांचा समावेश आहे.

नक्की वाचा : ‘डेटा’मय समाज माध्यमे आणि ‘सोशल इंजिनिअरिंग

दरम्यान, गुगलची ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ पिचाई यांच्याशी झालेल्या संवादाविषयी केलेल्या ट्विटच्या काही वेळानंतर झाली आहे. पंतप्रधान मोदींनी पिचाई यांच्यासोबत सकाळी झालेल्या संवादात प्रामुख्याने देशातील शेतकरी, तरुण व नउद्योजकांना कसे वर आणता येईल, याविषयी चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे ‘कोव्हिड-१९‘च्या संकटकाळातही गुगलने केलेली ही घोषणा महत्त्वाची असून, भारत तंत्रज्ञान गुंतवणुकीसाठी आकर्षक गंतव्य असल्याचे सिद्ध होते, असे शासकीय सूत्र म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here