२०२१ ची जनगणना होणार पूर्णतः डिजिटल

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 

आगामी २०१२१ मधील देशाची जनगणना ही पूर्णतः डिजिटल करण्याचा शासनाने निर्धार केला आहे.  काल सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या जनगणना भवनाची कोनशिला स्थापन केली. यावेळी, डिजिटल इंडियाला प्रोत्साहन म्हणून आगामी जनगणना पूर्णतः मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

२०२१ मध्ये केली जाणारी जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने करण्याचा शासनाचा मानस आहे. सोमवारी दिल्लीत जनगणना भवनाची कोनशिला स्थापन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली. आधी घरोघरी फिरून जनगणना केली जायची, पण आता ही माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे गोळा केली जाणार आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन आगामी जनगणना डिजिटल पध्दतीने करण्यात येणार आहे, असे शहा म्हणाले.

हेही वाचा : समाजमाध्यमांतून शिक्षकांची ‘तंत्रस्नेही’ वाटचाल

देशातील १३० कोटी पेक्षा जास्त लोकांच्या जनगणनेसाठी पहिल्यांदाच देशात मोबाइल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. जनगणनेच्या वेळी गोळा केलेली माहिती कल्याणकारी योजनांसाठीही उपयोगी पडेल. त्याचबरोबर मतदारसंघांच्या सीमा ठरवण्यासाठीही हीच माहिती आधारभूत ठरणार असल्याचेही शहा म्हणाले आहेत. सोबतच, भारताकडे लोकसंख्येच्या तुलनेत मर्यादित नैसर्गिक स्रोत आहेत, त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाला सरकारचे प्राधान्य असल्याचे शहा म्हणाले.

 

● भारतीय जनगणना २०२१

आगामी जनगणनेसाठी संदर्भ दिनांक 1 मार्च 2021 असेल,  तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीची लक्षात घेऊन तिथे 1 ऑक्टोबर 2020 हा संदर्भ दिनांक असेल.

हे वाचलंत का ? ‘मास्क्ड आधार’ म्हणजे काय?

याआधी झालेल्या 2011 च्या जनगणनेद्वारे गोळा  झालेल्या माहितीच्या आधारे वीजपुरवठा, गॅस कनेक्शन, रस्तेबांधणी, गरिबांसाठी घरं, बँक खाती अशा या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, २०११ च्या जनगणेची पूर्ण माहिती अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाही.

 

◆◆◆

 

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com  वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here