हर्षवर्धन शृंगला भारताचे नवे परराष्ट्र सचिव !

भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल सोमवारी एका आदेशपत्रकाद्वारे शृंगला यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ते सध्या अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी असलेले हर्षवर्धन शृंगला यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन शृंगला 29 जानेवारी 2020 पासून परराष्ट्र सचिव पदाचा पदभार सांभाळतील. ते विद्यमान परराष्ट्र सचिव विजय गोखले यांची जागा घेतील. विजय गोखले यांचा कार्यकाळ येत्या 28 जानेवारीला समाप्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने शृंगला यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेत यावर्षी पार पडलेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमास यशस्वी करण्यामागे शृंगला यांचा मोठा वाटा होता. अमेरिकेतील सुमारे 50 हजार भारतीयांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमात एकत्र आले होते.

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख !

● हर्षवर्धन शृंगला यांच्याबद्दल

– शृंगला यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं आहे.

– एकूण 35 वर्षांच्या नागरी सेवेच्या कार्यकाळात शृंगला यांनी अनेक महत्त्वांच्या पदावर काम केले आहे.

– आयएफएस अधिकारी बनण्याआधी त्यांनी खाजगी क्षेत्रात नोकरी केली आहे.

– अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून रुजू होण्याआधी हर्षवर्धन शृंगला बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत होते.

– तसेच, व्हिएतनाम, इस्राईल आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही महत्त्वाच्या पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here