‘कोव्हिड-१९’मुळे मृत्यू पावणाऱ्या डॉक्टरांना ‘कोरोना योद्धा’ घोषित करा : ‘आयएमए’ची मागणी

ब्रेनवृत्त | मुंबई

कोरोनाबधित रुग्णांवर उपचार करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मृत्य पावणाऱ्या डॉक्टरांना राज्य शासनाने ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित करावे, अशी मागणी ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (IMA : Indian Medical Association) केली आहे. सोबतच, ‘कोरोना वीरचक्र’ देऊन अशा डॉक्टरांचा गौरव केला पाहिजे, अशीही संघटनेची मागणी आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातच नव्हे, तर देशभरात गेले अनेक दिवस डॉक्टर जीवाची बाजी लावून कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेत आहेत. मात्र, या दरम्यान काही डॉक्टरांना कोरोना विषाणूचाप्रादुर्भाव होतो आणि त्यांचे दुर्दैवी मृत्यू होते. समाजाची सेवा करत करत अशाप्रकारे मृत्यू पावणाऱ्या राज्यातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात यावा अशी मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने केली आहे. अशा डॉक्टरांना राज्य राज्यशासनाने ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करावे आणि ‘कोरोना वीरचक्र’ देऊन गौरव करावा, अशी आयएमएची मागणी आहे.

राज्यातील कित्येक डॉक्टरांना कोरोना काळात विविध शारीरिक त्रास असतानाही ‘कोव्हिड-१९‘ बधितांची सेवा केली आहे आणि या दरम्यान स्वतःचे प्राण गमावले आहेत. सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ चित्तरंजन भावे यांची अँजिओप्लास्टी झाली होती आणि त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तरीही, केवळ रुग्णसेवेपोटी ते शेवटपर्यंत कार्यरत होते आणि रुग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोनाची बाधा झाली व तेे दगावले. तसेेच, सद्या आयएममएचे सुमारे 500 डॉक्टर अलगीकरण कक्षात असून, यांपैकी काही जणांवर उपचार सुरु आहे.

दरम्यान, यापूर्वी कोरोना काळात लढणाऱ्या डॉक्टरांना ‘योद्धे’ म्हणून गणना करण्याचा निर्णय पंतप्रधान व विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आतापर्यंत सहा डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शासकीय आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना ज्या पद्धतीने 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले आहे, त्याप्रमाणे खासगी व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना तेे कवच जाहीर केले जावे अशी संघटनेची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here