मुंबई महापालिकेकडून अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई

मुंबई, ७ जुलै

मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहनतळांच्या जवळील अनधिकृत पार्किंगवर आजपासून कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काल दिले. या कारवाई अंतर्गत पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात आढळणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई होणार आहे.

वाहन पार्किंच्या सुलभीकरणाच्या उद्देशाने महापालिकेद्वारे १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता जवळच्या रस्त्यांवर अनधिकृतरित्या वाहन लावले जातात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने आजपासून सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३  सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरातील अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवरील कारवाईला आजपासून सुरुवात होत आहे.

 

 

कोणत्या वाहनांवर किती दंड?

महापालिकेच्या या कारवाई अंतर्गत सार्वजनिक वाहनतळाच्या परिसरात अनधिकृतपणे उभ्या असलेल्या अवजड वाहनांवर १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर, मध्यम आकाराच्या वाहनांवर ११ हजार रुपये व कारसारख्या वाहनांवर १० रुपये दंड आकारला जाईल. अनधिकृतपणे पार्क केलेल्या रिक्षा, साईडकार असलेले दुचाकी वाहन आणि तीन चाकी वाहनांवर ८ हजार रुपये दंड व दुचाकी वाहनांवर किमान रुपये ५ हजार दंड आकारण्यात येणार आहे.

स्रोत : ट्विटर

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here