‘दहशतवाद’ सर्वात मोठा धोका : पंतप्रधान मोदी

दहशतवादाचा माणुसकीला सर्वात मोठा धोका असून, सर्व ब्रिक्स देशांनी दहशतवादाला मिटवण्यासाठी सोबत यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

 

वृत्तसंस्था एएनआय

ओसाका, २८ जून 

दहशतवाद हा मानवजातीला ‘सर्वात मोठा धोका’ असून, सर्व ब्रिक्स राष्ट्रांनी दहशतवादाला दुजोरा देणाऱ्या प्रत्येक घटकाला संपूर्णपणे मिटवण्यासाठी व वंशविद्वेषाला संपवण्यासाठी सोबत यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आज केले. ते जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या नेत्यांशी झालेल्या भेटीत बोलत होते.

जपानच्या ओसाका शहरात जी-२० देशांची शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या अनौपचारिक भेटीत बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या जगासमोर असलेल्या तीन सर्वात मोठ्या आव्हानांवर लक्ष वेधले. आर्थिक मंदी, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आणि दहशतवाद, ही तीन सर्वांत मोठी आव्हाने जगासमोर उभी असल्याची म्हटले. “मी सध्या जगासमोर असलेल्या तीन सर्वांत मोठ्या आव्हानांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. आर्थिक मंदी आणि त्यामुळे निर्माण होणारी अनिश्चितता, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आणि दहशतवाद ही तीन सर्वांत मोठी आव्हाने जगासमोर आहेत”, मोदी म्हणाले. यावेळी ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफॉस उपस्थित होते.

पुढे मोदी असेही म्हणाले की, “दहशतवाद हा माणुसकीला सर्वात मोठा धोका आहे. यामुळे निरपराध लोकांचे फक्त जीवच जात नाही, तर अर्थव्यवस्था व सांप्रदायिक सद्भावनेवरही नाकरात्मक परिणाम पडतो. यामुळे या दहशतवाद मदत करणाऱ्या व थारा देणाऱ्या प्रत्येक घटकाला व मार्गाला समूळ नष्ट करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी सोबत यावे.”

जी-२० देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ब्रिक्स देशांच्या या बैठकीआधी मोदींनी जपान आणि अमेरिकेच्या राष्टराध्यक्षांसह त्रिस्तरीय बैठकीत भाग घेतला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह झालेल्या बैठकीत कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता व सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी तिन्ही देशांकडून एकत्रितरित्या काय करता येईल यावर चर्चा केली असल्याचे, परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

(मूळ वृत्त मराठीब्रेन डॉटकॉम कडून भाषांतरित)

◆◆◆

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here