एमपीएससीचे अंतिम निकाल जाहीर ; एकूण १७ संवर्गांतील ४३१ पदे

ब्रेनवृत्त, मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०१९ मध्ये एकूण १७ संवर्गांतील ४३१ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात प्रसाद बसवेश्वर चौगुले यांनी एकूण ५८८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, पोलीस उपअधीक्षक पदासाठी चैतन्य वसंतराव कदम व सहायक विक्रीकर आयुक्त परीक्षेत गौरव भालाघाटिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

एमपीएससीतर्फे २०१९-२० या सत्रात एकूण १७ संवर्गातील ४३१ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये पुढीलप्रमाणे पदभरती करावयाची होती. उपजिल्हाधिकारी (40), पोलिस उपअधिक्षक तथा सहायक पोलिस आयुक्‍त (31), सहायक राज्यकर आयुक्‍त (12), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (21), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (16), उद्योग उपसंचालक (6), तहसिलदार (77), उपशिक्षणाधिकारी (25), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (3), कक्ष अधिकारी (16), सहायक गट विकास अधिकारी (11), उपअधिक्षक भूमी अभिलेख (7), राज्य उत्पादन शुल्क उपअधिक्षक (10), सहायक आयुक्‍त राज्य उत्पादन शुल्क (1), उद्योग अधिकारी (26), सहायक प्रकल्प अधिकारी (5), नायब तहसिलदार (113) अशी एकूण ४३१ पदे.

हेही वाचा : एमपीएससीचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; १३ सप्टेंबरला राज्यसेवा !

मात्र, ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या उपाययोजनांमुळे आयोगातर्फे या परीक्षांचे अंतिम निकाल प्रतिक्षेतच होते. शेवटी, आज एमपीएससीने या सर्व पदांसाठीचे अंतिम निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात अभिषेक दिपक कासोडे यांनी, तर सहायक संचालक, वित्त व लेखा विभाग यामध्ये ज्ञानराज गणपतराव पौळ यांनी यश मिळविले. तसेच, उद्योग उपसंचालक संवर्गात आकाश राजाराम दहाडे यांनी, तर तहसिलदार संवर्गात ज्ञानेश्‍वर माणिकराव काकडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here