‘साजिद-वाजिद’ जोडीतील वाजिद खान यांचे निधन

ब्रेनवृत्त, मुंबई

हिंदी सिनेसृष्टीतील ‘साजिद-वादीत’ या प्रसिद्ध संगीतकारांच्या जोडीतील वाजिद खान यांचे आज रात्री वयाच्या ४२ व्या वर्षी किडनीच्या संसर्गाने निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे सिनेजगताला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ते ‘कोव्हिड-१९’ पॉझिटिव्ह आल्याचीही नोंद झाली होती.

संगीतकार सलिम मर्चंट यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, वाजिद खान यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून चेंबूर येथील सुरांना रुग्णालयात उपचार सुरू होते. वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या व किडनीचीही समस्या समस्या होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपन क्रियाही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी किडनीचा संसर्ग झाल्याने गेल्या ४ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे नाव आले, की जोडीने ‘साजिद-वाजिद’ या जोडीचेही नाव येतेच.  १९९८ मध्ये त्यांनी सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ मधून सुरुवात केली होती. यानंतर, गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग सारख्या सिनेमांच्या गाण्यांची रचना केली होती. वाजिद यांनी सलमानसाठी ‘मेरा ही जलवा’, ‘फेव्हिकॉल से’ ही गाणी गायली होती. तर, अक्षय कुमारसाठी ‘चिंता ता चिता चिता’ हे गाणे गायले होते. अलिकडेच टाळेबंदीच्या काळात त्यांनी सलमानचे ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ या गाण्यांना संगीत दिले आहे.

कोरोनाच्या या काळात गेल्या महिन्यात बॉलिवूडला दोन मोठे धक्के बसले होते. प्रतिभावंत अभिनेते इरफान खान आणि जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनाही भारतीय चित्रपटसृष्टीने गमावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here