महाराष्ट्रासह १२ राज्यांत ‘एक देश, एक रेशनकार्ड’ लागू!

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

नववर्षाच्या आगमनासोबतच देशात ‘एक देश, एक रेशन कार्ड’ या योजनेचेही आगमन झाले आहे. देशातील एकूण 12 राज्यांमध्ये ही एकछत्री योजना कालपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी हिंदीत ट्विट करून दिली. या १२ राज्यांमध्ये महाराष्ट्र व दक्षिणेकडील तामिळनाडू सोडून इतर सर्व राज्यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी काल १ जानेवारी २०२० पासून देशातील एकूण १२ राज्यांत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली. काल एका ट्विटमधून त्यांनी ही माहिती दिली. योजनेच्या या पहिल्या टप्प्यात  आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. तसेच, देशातील उर्वरित सर्व राज्यांत ही योजना जून, २०२० पासून अंमलात आणली जाणार असल्याचेही त्यांनी  म्हटले आहे.

याआधी, ३ डिसेंबर २०१९ रोजी पासवान यांनी ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही योजना जून, २०२० पासून देशातील सर्व राज्यांत कोणत्याही अडथळ्यांविना लागू केली जाणार असल्याची माहिती दिली होती.

‘एक देश, एक शिधापत्रिका’ (वन नेशन, वन रेशनकार्ड) या योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांना वरील १२ राज्यांमध्ये कुठेही वास्तव्यास असताना त्यांच्या वाट्याचे रेशन मिळवता येईल.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here