मोदींचा सवाल, “शरद पवार साताऱ्यातून का लढत नाहीत ?”

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यात सभा

ब्रेनवृत्त, सातारा

सातारा हा राष्ट्रवादीचा गड मानला जात असतानाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक का लढवत नाहीत? अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच पार पडणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीच्या प्रचारात मोदी बोलत होते. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मोदी साताऱ्यात आयोजित सभेत उपस्थित होते.

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यात सभा आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात आले होते. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. “सातारा राष्ट्रवादीचा गड मानला जातो, त्यामुळे शरद पवारांनी उदयनराजे यांच्याविरोधात पवारांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. मग तरीही शरद पवार साताऱ्यातून निवडणूक का लढत नाहीत? पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढण्यास नकार का दिला?” असे खोचक सवाल यावेळी मोदींनी केले.

सोबतच, सातारा ही त्यांची गुरुभूमी असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ते म्हणाले, “साताऱ्याने देशाला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता दिला. माझे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे याच पुण्यभूमीतले होते. त्यामुळे सातारा ही माझी गुरुभूमी आहे.”

काँग्रेसच्या काळात झाले होते तीन सर्जिकल स्ट्राईक !

उदयनराजे भोसले यांनी मागील महिन्यात सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत होत आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here