रेल्वेच्या तिकीट दरांत विमान प्रवास शक्य!

मुंबई, ३० जानेवारी

लांब पल्ल्याच्या रेल्वेचे तिकीट जर कन्फर्म झाले नाही, तर त्याच दरात प्रवाशांना विमान प्रवासाची तिकीट उपलब्ध करून देण्याची संकल्पना समोर आली आहे. यासाठी आयआयटी व आयआयएमसारख्या  संस्थांमधील माजी विद्यार्थ्यांनी ‘रेलोफाय’ नावाचे अनुप्रयोग (अप्लिकेशन) तयार केले आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खुशखबरच आहे.

मुंबईत रोहन देढिया, रिषभ संघवी आणि वैभव सराफ या आयआयटी, आयआयएममधून शिक्षण घेतलेल्या तरुणांनी रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवखी संकल्पना मांडली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या ट्रेनचे तिकीट कन्फर्म मिळत नसेल, तर त्याच दरात विमानाने प्रवाशांना प्रवास करणे शक्य होणार आहे. यासाठी या तरुणांनी ‘रेलोफाय’ हे मोबाईल ऍप तयार केले आहे. सहसा रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही, तर प्रवाशांना वेटिंगच्या तिकीटवर अनेक त्रास सहन करत रेल्वेने प्रवास करावा लागतो. मात्र आता या नव्या अनुप्रयोगामुळे याच तिकिटांच्या दरात विमानाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

● ‘रेलोफाय’ मागील संकल्पना

भारतात दररोज जवळपास 50 हजार रिकाम्या सीट घेऊन विमाने उडतात. याचे मुख्य कारण म्हणजे विमान प्रवासाचे तिकीट दर. जर याच रिकाम्या सीट कमी पैशात वेटिंग तिकीट असणाााऱ्या रेल्वे प्रवाशांना मिळाल्या, तर त्यातून रेल्वे प्रवासी आणि विमान कंपन्यांचाही फायदा होईल. याच दुहेरी फायद्याच्या संकल्पनेतून तरुणांनी हे अप्लिकेशन तयार केले आहे.

दिल्लीत उभारण्यात आले ‘पहिले स्मॉग टॉवर

● विमानाचे तिकीट कसे मिळेल?

रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर ‘रेलोफाय’ या मोबाईल अनुप्रयोगावर जाऊन  सर्वप्रथम आपला पीएनआर नंबर टाकून नोंदणी करण्याची. यासाठी ‘ट्रॅव्हल गॅरंटी फी’ अर्थात रजिस्ट्रेशन फी भरायची. त्यानंतर जर प्रवासाच्या दिवशी तुमचे रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही, तर रेल्वेच्या तात्काळ तिकीटाइतके पैसे भरायचे व पुढील 24 तासांत विमानाने तुमच्या गावाजवळील विमानतळापर्यंत प्रवास करायचा. या नव्या मोबाईल तंत्रज्ञानामुळे प्रयोगामुळे तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे गावी जाण्याचे, फिरायला जाण्याचे बेत रद्द करावे लागण्याच्या त्रासाला आळा बसणार आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here