1905 मधील नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?www.marathihelp.com

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.

ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. इ.स. २०१४ मधील ९४वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सांगली येथे अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली, तर ९५वे संमेलन इ.स. २०१५मध्ये बेळगाव येथे, संगीत नाटकांतल्या अभिनेत्री फय्याज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले..

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी : (१ले ते १०वे संमेलन)

१ले. इ.स. १९०५. मुंबई : ग.श्री. खापर्डे

२रे. इ.स. १९०६. नाशिक : न.चिं. केळकर

३रे. इ.स. १९०७. पुणे : कृ.प्र. खाडिलकर

४थे. इ.स. १९०८. नाशिक : नी.वि. छत्रे

५वे. इ.स. १९०९. पुणे : डॉ. ग.कृ. गर्दे

६वे. इ.स. १९१०. पुणे : प्रा. चिं.गं. भानू

७वे. इ.स. १९११. मुंबई : विष्णु दिगंबर पलुस्कर

८वे. इ.स. १९१२. अमरावती : मो.वि. जोशी

९वे. इ.स. १९१३. पुणे : के.रा. छापखाने

१०वे. इ.स. १९१४. पुणे : शि.म. परांजपे

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:29 ( 1 year ago) 5 Answer 5462 +22