अध्यापन तंत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

अध्यापन तंत्र म्हणजे काय?

अध्यापनाचे तंत्र म्हणजे अध्यापन विषयक घेतलेला पवित्रा. अध्यापन कार्यात विविध पद्धतींबरोबरच तंत्रेही वापरली जातात. यामध्ये प्रश्नोत्तर, नाट्यीकरण, बुद्धिमंथन, चर्चा, सांघिक अभ्यास यांसारख्या अनेक अध्यापन तंत्रांचा समावेश असतो. पाठ प्रभावी व मनोरंजक करण्याचे ते तंत्र आहे.

अध्यापन पद्धती व तंत्र - Teaching methods and techniques

भाषेच्या पाठ्यपुस्तकात गद्य-पद्य पाठ असतात. या पाठाच्या अनुषंगाने व्याकरण असते. वाचन, लेखन, वाक्प्रचार, म्हणी, शब्दार्थ, संदर्भ, प्रश्न, स्वाध्याय दिलेले असते. पाठाचा, लेखकाचा परिचय, पाठाची संहिता असते. भाषेच्या पाठ्यपुस्तकात चरीत्र - आत्मचरित्र, लघुकथा, प्रवासवर्णन, कादंबरीतील उतारा, नाट्यछटा, नाट्यप्रवेश, निबंध, पत्रे इत्यादी प्रकार असतात. पद्यातही संतकाव्य, भावगीत, पंडितीकाव्य, शाहिरी काव्य, नाट्यगीत, सुनीत, जनपद्गीत, दलित काव्य, निसर्ग कविता, आधुनिक कविता, नवकविता असे विविध प्रकार प्रामुख्याने दिसून येतात.

विद्यार्थ्यांचे अध्ययन गतिमान करू शकणारे अध्यापन प्रभावी अध्यापन मानले जाते. अध्यापकाची इच्छा असते की अध्यापन करताना ते विद्यार्थ्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडावे. मातृभाषेचे अध्यापन करताना प्रभावी व्हावे. संस्कारक्षम व्हावे अध्ययन गतिमान होण्यासाठी त्याला मानसशास्त्रीय बैठक असावी लागते.

अध्यापनाच्या विविध पद्धती, तंत्रे, साधनांचा उपयोग करून अध्यापन प्रभावी करावे लागते. अध्यापनाच्या विविध पद्धतीचा उपयोग करतांना विद्यार्थ्यांचे वय, बौद्धिक क्षमताचाही विचार करावा लागतो.

शिक्षक विद्यार्थ्यांना आपण जी माहिती देतो ती परिणामकारकपणे देण्यासाठी शिक्षकांची व विद्यार्थ्यांची कृती निश्चित करावी लागते. याकरिता विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, बौद्धिक पातळी, क्षमता, अनुभव इत्यादी बाबी लक्षात घ्याव्या लागतात. याची सुयोग्य व क्रमबद्ध मांडणी म्हणजेच अध्यापन पद्धती व अध्यापनाची तंत्रे होय. अध्यापनाच्या विविध पद्धतीची व अध्यापनाच्या तंत्राची माहिती शिक्षकाला असणे आवश्यक आहे. ज्या अभ्यास घटकासाठी जी पद्धत व तंत्र सर्वोत्कृष्ठ आहे तेथे त्या पद्धती व तंत्राचा वापर शिक्षकाला करता यायला हवा. मराठी अध्यापनाच्या विविध पद्धती व तंत्रे आहेत. उद्गामी, अवगामी, कथन, व्याख्यान, परिसंवाद, प्रकल्प, बुद्धीमंथन, तौलनिक, संभाषण, सर्वसमावेशक इत्यादी पद्धती भाषा अध्यापनाकरिता उपयुक्त व महत्त्वपूर्ण आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 4950 +22