अर्थव्यवस्थेतील लहान्यात लहान घटकांचा अभ्यास करणे म्हणजे काय?www.marathihelp.com

विभाजन पद्धत होय. संपुर्ण अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या बेरजेच्या स्वरुपातीलएकूण परिमाणाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे राशी पद्धत होय.

1 ] वैयक्तिक घटकांचा अभ्यास : [ The study of individual factors ]
सूक्ष्म अर्थशास्त्रात्रात विशिष्ट उदयोग संस्था , कुटुंब संस्था , वैयक्तीक किंमती या सारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास केला जातो . 

2 ] किंमत सिध्दांत : [ Price theory ] 
सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिध्दांत किंवा मूल्य सिध्दांत असे म्हणतात कारण या मध्ये वस्तू व सेवांची किंमत तसेच उत्पादन घटकांच्या किंमत कशा ठरतात याचा अभ्यास केला जातो .
 
3 ] आंशिक समतोल: [ Partial equilibrium ] 
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय . आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता , एका उत्पादन संस्था , विशिष्ट उद्योग इ . वैयक्तीक आर्थिक घकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते आंशिक समतोलात वैयक्तीक घटकांला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा अभ्यास स्वतंत्रपणे केला जातो .

4 ] विशिष्ट गृहितकांवर आधारित : [ Based on specific assumptions ]
सूक्ष्म अर्थशास्त्राचे विवेचन "इतर परिस्थिती कायम " या मूलभूत गृहितांचा आधार घेवून सुरुवात केली जाते . हे अर्थशास्त्र पूर्ण रोजगार , शुद्ध भांडवलशाही , पूर्ण स्पर्धा , सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इ. गृहितकांवर आधारित आहे 

5 ] विभाजन पध्दत : [ Partition Method ]
सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो . म्हणजेच या अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो . उदा . राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्न , समग्र मागणीतील वैयक्तिक मागणी इ . चा अभ्यास केला जातो .

6 ] सीमांत तत्वाचा वापर : [ Use of marginal principle ] 
सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे . सीमांत परिणाम म्हणजे एक वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय . सीमांत तत्वाचा वापर , सूक्ष्म बदलांचा परिणाम , उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेतांना केला जातो.
 
7 ] बाजार रचनेचे विश्लेषन : [ Analysis of market structure ] 
सूक्ष्म अर्थशास्त्रात पुर्ण स्पर्धा मक्तेदारी युक्त स्पर्धा , मक्तेदारी , अल्पाधिकार , बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषन करते .

8 ] मर्यादित व्याप्ती : [ Limited scope ] 
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपूरती मर्यादित आहे . उदा . वैयाक्तीक वेतन , वैयाक्तीक किंमत , वैयाक्तीक मागणी , व वैयाक्तीक पुरवठा इ .

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 4612 +22