आनंददायी शिक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

आनंददायी शिक्षण :

आनंददायी शिक्षण मुळातच प्राथमिक स्तरावरील बालकांना आनंदी राहणे ,खेळणे ,
बागडणे अनेक प्रकारच्या गमतीजमती फार आवडत असतात .
त्यांना जर या प्रकारचे वातावरण शाळेत अथवा वर्गात मिळाले
नाही तर वर्गात स्थिर बसू शकत नाही.

त्याना कंटाळवाणे होतो तर 
त्यांचे मन वर्गात रमत नाही ,विद्यार्थ्यांना आपणाला दिवसभर
शाळेत वर्गात ठेवायचे असते,त्यामुळे मुल टिकेल व शिकेल या
गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते .आपले दैनंदिन अध्यापन
करत असताना बालकांचे अध्ययन आनंदी आणि मनोरंजनात्मक
रित्या कसे प्रभावी होईल या बाबीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे
आहे.बालकाची गरज लक्षात घेऊन विशेष अध्ययन अनुभवांची
निर्मिती किंवा निवड शिक्षकाने करावी.
विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना करेल
या अध्ययन अनुभवाद्वारे
विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना करेल यामुळे त्यांचे अध्ययन
आनंदी होईल.त्याच प्रमाणे जे विद्यार्थी ज्या विषयात प्रबळ आहेत
उदाहरणार्थ गायन ,वादन ,चित्रकला इत्यादी व ज्या विद्यार्थ्यांकडे
विशेष लक्ष देणे गरजेचे आहे अशा विद्यार्थ्यांना वेगळे उपक्रम देणे
आवश्‍यक आहे .त्यामुळे त्यांच्या मधील कमतरता भरून निघेल.त
त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल .त्यासाठी एखादा भाग घटक
समजत नसेल तर भाषा सोपी करणे टप्प्याने मार्गदर्शन करणे
कृतीयुक्त पद्धतीने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे ,विविध
पद्धतीचा साहित्याचा वापर करणे इत्यादी बाबीचा वापर करून
विद्यार्थ्यांचे अध्ययन आनंदी होऊ शकते. बालकांचा मोफत व
सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 29 (2 )
मधील ( ड )छ नुसार बालकांना बालस्नेही व आनंददायी वातावरण
बालकेंद्रीत पद्धतीने प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा बालकांचा हक्क
आहे.

आनंददायी शिक्षण
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क
बालकांचे अध्ययन जर आनंदी करायचे असेल ,तर बालकाला
शाळेविषयी परिसराविषयी प्रेम व आस्था वाटायला हवी.यासाठी
आपल्याला असे वातावरण शाळेत निर्माण करावे लागेल .बालकांचे
जर आपण व्यवस्थित रीत्या निरीक्षण केले तर मुले घरात आनंदाने र
ाहतात मनसोक्त खेळत असतात घरातील व परिसरातील सर्व
व्यक्तींशी न घाबरता मनमोकळेपणाने बोलत असतात.येणे प्रमाणे
जर त्याला शाळेत वर्गात वातावरण मिळाले तर निश्चितच त्यांचे अध्ययन
आनंददायी होऊ शकते. तर बालकाला नवीन शिकण्याची आवड असते
.म्हणून शाळेत येणाऱ्या वर्गातील प्रत्येक वर्गात या प्रकारचे अध्ययन
त्याला मिळाले पाहिजे .यासाठी बालपणाचा त्यांच्या भावनांचा कल्पना
शक्तींचा त्यांच्या आवडीनिवडीचा विचार व्हावयास हवा त्याप्रमाणे त्याला
मुक्त वातावरणात अनुभव प्राप्त करून घेण्याची संधी उपलब्ध करून
दिल्यास अध्ययन आनंदी होण्यास मदतच होईल.
बंड्यांची शाळा लय भारी-शैक्षणिक लेख
अध्ययन आनंदी होण्यास मदतच होईल
बालकांना कोणत्याही
प्रकारची भीती आथवा दडपण व चिंतेपासून मुक्त ठेवावे .जेणेकरून
बालक आपली मते निर्भीडपणे मुक्तपणे व्यक्त करण्यास तयार होतील.
वर्गातील वातावरण आनंददायी पद्धतीने निर्माण करून त्यांना त्यांच्या
आवडी निवडीचे स्वातंत्र्य देऊन त्यांच्या योग्यतेप्रमाणे वेगवेगळे उपक्रमाद्वारे
आनंददायी पद्धतीने अध्ययन करण्यास प्रोत्साहित करावे .असे केल्यास
वर्गाची उपस्थिती सुद्धा टिकून राहील व अध्ययन विषयी गोडी वाटेल उद्दिष्ट
साध्य करत असताना 100% पटनोंदणी करून झाली म्हणजे आपले काम
संपत नाही ,खरे तर शाळेत आलेली बालके शाळेत जर टिकली नाही रमली
नाही तर आपण केलेल्या खटाटोपाचा काय उपयोग.
अध्ययन आनंदी व परिणामकारक होऊ शकते

बालक शाळेत आल्यावर

मजेत आनंदात खुशीत राहण्यासाठी वर्गातील अध्ययन आनंददायी होणे
अत्यंत महत्वाचे आहे .म्हणून बालकांचे अध्ययन आनंदी होण्यासाठी वर्गातील
गमतीजमती नवीन मनोरंजन विविध उपक्रम गाणे, कविता ,कला ,अभिनय
विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मजेदार खेळ या बाबींचा समावेश होणे गरजेचे
आहे .आणि त्यामुळे अध्ययन आनंदी व परिणामकारक होऊ शकते.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 5225 +22