आर्मी साठी किती शिक्षण लागते?www.marathihelp.com

भारतीय सैन्यदलात भरती कसे व्हावे – How to join Indian Army in

आपल्या देशातील सगळयात मोठया तसेच बलाढय भारतीय सैन्यात आपली भरती व्हावी ही खुप तरूणांची ईच्छा असते.

कारण आपल्या देशाच्या सर्वात मोठया सैन्यात काम करायला मिळणे ही एक खुप अभिमानाची आणि सम्मानाची गोष्ट असते.आणि हा सम्मान आपल्याला प्राप्त व्हावा हे खुप जणांना वाटत असते.

भारतीय सैन्यात भरती झाल्यावर आपल्याला एक चांगले वेतन,उत्तम जीवणशैली,समाजात आदराचे स्थान मिळत असते.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे आपल्या देशाची सेवा करण्याची एक मौल्यवान संधी आपल्याला प्राप्त होत असते.

पण आपल्यापैकी खुप जणांना भारतीय सैन्यात भरती व्हायची ईच्छा असुन देखील योग्य ते मार्गदर्शन प्राप्त न झाल्याने काही विदयार्थ्यांना भारतीय सैन्यात भरती होता येत नसते.

कारण मनामध्ये भारतीय सैन्यात भरती होण्याची ईच्छा बहुतेक दहावी,बारावी पास केलेल्या तसेच पदवीधर विदयार्थ्यांची असते.

पण भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?वयाची अट काय असते?भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी कोणती परिक्षा आपणास द्यावी लागते भारतीय सैन्यात आपण कोणकोणत्या पदावर रुजू होऊ शकतो.इत्यादी महत्वाच्या बाबी आपणास माहीत नसतात.

म्हणुन आजच्या लेखात आपण भारतीय सैन्यात भरती कसे होऊ शकतो?त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे सर्व काही एकदम सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
भारतीय सैन्यदलात कोणत्या पदांसाठी अर्ज करू शकतो? – List of post you can apply in Indian Army

 भरपुर विदयार्थ्यांना एकच संभ्रम असतो की भारतीय सैन्यात आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या बळावर कोणकोणत्या पदावर आपण भरती होऊ शकतो.

कारण भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती केली जाते त्यातच कोणत्या पदासाठी किती शिक्षणाची आवश्यकता असते हेच बहुतेक विदयार्थ्यांना माहीत नसते.

याचसाठी आपण किती शिक्षण घेतलेले आणि कोणत्या शाखेतुन शिक्षण घेतलेले विदयार्थी कुठल्या पदासाठी अँप्लाय करू शकतात हे अगोदर जाणुन घेऊया.




भारतीय सैन्यातील पदांसाठी अर्ज – दहावी व बारावीनंतर : –


1) एन डी तसेच एन ए (National Defense Academy) : National Defence Academy (NDA)

 ज्या विदयार्थ्यांचे सायन्स ह्या फँकल्टीमधुन शिक्षण झाले असेल असे विदयार्थी नँशनल डिफेन्स अकँडमी मध्ये तसेच नौदलात भरतीसाठी अर्ज करू शकता.
ही परिक्षा लिखित स्वरूपात (Union Public Service Commission) कडुन सोळा ते एकोणावीस वयोगटातील तरूणांसाठी दोन वेळेस घेतली जात असते.साधारणपणे यातील पहिल्या परिक्षेचा कालावधी एप्रिल तसेच मे महिना असतो.तर दुसरी परिक्षा आँक्टोंबर तसेच नोव्हेंबर महिन्यात घेतली जाते.
ह्या परिक्षेत ज्यांची निवड होते त्या उमेदवारास लष्कर,नौदल तसेच वायु दलात लेफ्टनंट पदावर भरती करण्यात येते.
यात लेखी परिक्षा,मुलाखत आणि वैदयकीय तपासणी ह्या तीन राऊंडमध्ये पास झाल्यावर उमेदवाराचे
सिलेक्शन केले जाते.एनडीए हे कायमस्वरूपी आयोगाच्या अंतर्गात येत असते.यात आपण सेवानिवृत्तीच्या काळापर्यत नोकरी करू शकतात.

2)आय ए एफ सीएटी :

अनेक विदयार्थ्यांना वायुदलात काम करावे असे वाटत असते.ज्यांना वायुदलात भरती व्हायचे आहे त्यांना काँमन अँडमिशन टेस्ट द्यावी लागत असते.
या परिक्षेसाठी आर्ट आणि सायन्स फँकल्टीमधील 12 वी पास विदयार्थी अँप्लाय करू शकतात.
फक्त ह्या परिक्षेसाठी अर्ज करायला उमेदवाराचे वय 16 ते 19 असावे लागते.

3) आय ए एफ ग्रृप एक्स अणि वाय :

 भारतीय वायुदलाकडुन एक्स आणि वाय पदांची भरती केली जाते.आणि ही भरती दहावी तसेच बारावी पास बेसवर केली जात असते.

4) एस एससी जीडी भरती :

 स्टाफ सिलेक्शन कमिशन बारावी पास विदयाथ्यांसाठी जीडी काँन्सटेबल ह्या पदांची भरती आयोजित करत असते.
ह्या परिक्षेचे आयोजन बीएस एफ,सीआरपीएफ,आसाम रायफल,सीआय एस एफ इत्यादी मध्ये जीडी काँन्स्टेबल पदाची भरती करण्यासाठी केले जाते.

5) इंडियन आर्मी रिक्रुटमेंट रँली :

 सैन्यात भरती केली जाण्यासाठी संपुर्ण देशात विविध राज्यांत रँलीचे आयोजन केले जात असते.या रँलितच भारतीय सैन्यात सैनिक पदासाठी उमेदवारांची निवड देखील केली जात असते.या पदासाठी उमेदवाराचे वय किमान 16 ते 21 असावे लागते.

6) टी ई एस : Technical Entry Scheme (TES)

ज्या उमेदवारांनी बारावी सायन्स विषय 70 टक्के घेऊन पुर्ण केली असेल ते विदयार्थी टीईएस डायरेक्ट इंट्रीसाठी पात्र ठरत असतात.त्यांना कुठलीही परिक्षा मुलाखत द्यावी लागत नसते.
फक्त बारावी तसेच पदवीच्या टक्केवारीनुसार त्यांना शाँर्ट लिस्ट केले जात असते.फक्त त्या उमेदवाराचे वय 16 ते 19 असणे फार गरजेचे असते.
टीई एस हे कायमस्वरूपी आयोगाच्या अंतर्गात येत असते.यात आपण सेवानिवृत्तीच्या काळापर्यत नोकरी करू शकतात.

भारतीय सैन्यातील पदांसाठी अर्ज – पदवी शिक्षणांतर : – Join Indian Army after graduation degree

1)सी–डी–एस : Combined Defence Service (CDS)

युपीएससी तर्फे सीडीएस परिक्षेचे दोन वेळा घेतली जाते.ज्याचे ग्रँज्युएशन पुर्ण असेल ते आय एम ए तसेच ओटीए पदासाठी अँप्लाय करू शकतात.

ज्या विदयार्थ्यांना पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर सैन्यात भरती व्हायचे असेल ते विदयार्थी सीडीएस परिक्षेसाठी अँप्लाय करू शकतात.

सीडीएस पदासाठी आपल्याला पुर्व परिक्षा,मुख्य परिक्षा,शारीरीक तपासणी,मेडिकल टेस्ट,जीडी डाँक्युमेंट व्हेरीफिकेशन ह्या प्रोसेसला सामोरे जायचे असते.

वरील सर्व परिक्षेत पात्र ठरल्यास आपणास आपण ज्या सीडीएस पदासाठी अर्ज केला आहे ते पद प्राप्त होत असते.फक्त या पदासाठी आपले 19 ते 25 दरम्यान असावे लागते.

सीडीएस हे कायमस्वरूपी आयोगाच्या अंतर्गात येत असते.यात आपण सेवानिवृत्तीच्या काळापर्यत नोकरी करू शकतात.

2) टी–ए : Territorial Army (TA)

यात जे आधीपासुन नोकरी करीत आहेत असे उमेदवार अर्ज करू शकतात.फक्त यात उमेदवाराचे वय हे 18-42 असणे गरजेचे असते.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ही परमनंट नोकरी नसते यात गरज पज पडल्यावर आपणास बोलावले जात असते.यात उमेदवारांची लेखी परिक्षा,मुलाखत तसेच वैदयकीय तपासणी सुदधा केली जात असते.

3) शाँर्ट सर्विस कमिशन टेक्निकल: Short Service Commission Technical

 जे उमेदवार शाँर्ट सर्विस कमिशन टेक्निकल पदासाठी अँप्लाय करू इच्छित आहे.त्यांचे डिप्लोमा तसेच इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण असणे गरजेचे आहे.

 

जे कर्मचारी शाँर्ट लिस्ट केले जातील ते शाँर्ट सर्विस कमिशन नुसार सेवा पुरवण्याचे काम करू शकतात ह्या परिक्षेचे नोटिफिकेशन जुलै डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान दिले जाते.

 

4) JAG अँडव्होकेट जनरल इंट्री : Judge Advocate General Entry (JAG)

 

ज्या उमेदवारांचे एल एलबीचे शिक्षण पुर्ण झाले आहे आणि त्यात त्यांना किमान 50 टक्के मिळाले आहे तर ते बार काऊन्सिल आँफ इंडियासाठी पात्र ठरत असतात.

 

यात उमेदवाराचे रेजिस्ट्रेशन झाल्यावर त्यांना शाँर्ट लिस्ट केले जाते.आणि एस एस बी मुलाखतीसाठी देखील बोलावण्यात येते.यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 27 असणे आवश्यक असते.

 

या परिक्षेचे नोटिफिकेशन जुलै ते जानेवारी महिन्यात येत असते.

 

5) एन सीसी : NCC

 एनसीसी प्रवेश परिक्षा अशा तरूण पदवीधरांसाठी आहे ज्यांना वरिष्ठ डिव्हीजन आर्मीत काम करण्याचा दोन वर्षाचा अनुभव आहे.

या पदासाठी अँप्लाय करण्यासाठी उमेदवाराकडे एनसीसीचे बी ग्रेड सर्टिफिकिट असणे गरजेचे आहे.

तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षात 50 टक्के देखील असावे लागते.

या परिक्षेसाठी उमेदवाराचे 19 ते 25 असावे लागते.आणि ह्या परिक्षेचे नोटिफिकेशन जुलै आँगस्ट जानेवारीत येत असते.

परमनंट कमिशनमध्ये आणि शाँर्ट हेड कमिशनमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असतो?

परमनंट कमिशनमध्ये आपणास भारतीय सैन्यात निवृत्त होईपर्यत नोकरी तसेच करिअर करता येत असते.

परमनंट कमिशनमध्ये पुढील पदांचा समावेश होत असतो:

1)एन-डी -ए

2) टी ई एस

3) सी-डी एस

 

शाँर्ट कमिशनमध्ये आपणास भारतीय सैन्यात 10 वर्षे होईपर्यत नोकरी तसेच करिअर करता येत असते.

 

त्यानंतर आपल्याला दिलेल्या पर्यायातुन आपण परमनंट कमिशनची निवड करू शकतो,आपल्या सेवेत चार वर्षाची वाढ करू शकतो.किंवा आपण आपली निवड रदद देखील करू शकतो.

शाँर्ट सर्विस कमिशनमध्ये पुढील पदांचा समावेश होत असतो:

1)एस एससी टेक :

2) सीडी-एस :

3) अँडव्होकेट जनरल इंट्री :

4) एन सी सी :

 

सीडीएस,एस एससी टेक,एनसीसी,अँडव्होकेट जनरल इंट्री,टीए महिला आणि पुरूष वर्गासाठी ओपन करण्यात आले आहे.

 
भारतीय सैन्यातील अधिकारी वर्गाच्या खाली असलेली भरतीची पदे : Join Indian Army as a Personnel below Officer Rank (PBOR)

 भारतीय सैन्यात अधिकारी दर्जाच्या खाली असलेल्या कर्मचारी वर्गात लढाऊ,टेक्निकल,सेवा आणि प्रशासकीय सैन्याचा देखील समावेश होत असतो.

 ज्यांना OR,JCO अशा विविध श्रेणीत वर्गीकृत केले जाते.

सोल्जर जनरल डयुटी- Soldier General Duty         

वय मर्यादा 17 ते 21(दहावी 45 टक्के मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक असते,प्रत्येक विषयात 33 गुण असणे अनिवार्य)

सोल्जर टेक : Soldier Tech

यात टेक्निकल आर्म्स,आर्मी एअर डिफेंस आर्टिलरी इत्यादींचा समावेश होत असतो.

वय मर्यादा आपली 17 ते 21 असणे गरजेचे असते.(बारावी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक.प्रत्येक विषयात 40 गुण असणे अनिवार्य अंँग्रीगेट 50 टक्के)

स्टोअर कीपर/सोल्जर क्लार्क : Store Keeper/ Soldier Clerk

वय मर्यादा आपली 17 ते 23 असणे गरजेचे असते.(बारावीत Aggregate 60 टक्के असणे आवश्यक,प्रत्येक विषयात मुख्यकरून मँथँमँटिक्स,बुक किपिंग,इंग्रजीमध्ये किमान 50 गुण आवश्यक)

सोल्जर नर्सिंग असिस्टंट : Soldier Nursing Assistant/ Tech

वय मर्यादा आपली 17 ते 23 असणे गरजेचे असते.(बारावी केमिस्ट्री,फिजिक्स,बायोलाँजी,इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण,उमेदवाराला Aggregate 50 टक्के प्रत्येक विषयात 40 गुण असणे आवश्यक)

आर्मी मेडिकल काँर्प्स : Sepoy -Army Medical Corps

वय मर्यादा आपली 19 ते 25 असणे गरजेचे असते.(बारावी केमिस्ट्री,फिजिक्स,बायोलाँजी,इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण,उमेदवाराने स्टेट फार्मसी काऊंसील तुन डी फार्मा 55 टक्के घेऊन पुर्ण करणे आवश्यक)

ज्युनिअर कमिशन आँफिसर केटरींग :

वय मर्यादा आपली 21 ते 27 असणे गरजेचे असते.(हाँटेल मँनेजमेंटचा कोर्स,डिप्लोमा केलेला असावा)

सोल्जर नर्सिंग असिस्टंट,रिमोट व्हर्टीनरी काँर्प्स : Soldier Nursing Assistant

वय मर्यादा आपली 17 ते 23 असणे गरजेचे असते.(बारावी केमिस्ट्री,फिजिक्स,बायोलाँजी,इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण,Aggregate 50 टक्के मार्क्स,प्रत्येक विषयात गुण असणे गरजेचे)

सोल्जर ट्रेडसमन :

वय मर्यादा आपली 17 ते 23 असणे गरजेचे असते.(दहावीत उत्तीर्ण,प्रत्येक विषयात 33 गुण आवश्यक)

सर्वे आँटोमँटेड कार्टोग्राफर :

वय मर्यादा आपली 17 ते 23 असणे गरजेचे असते.(गणित विषय घेऊन बी ए तसेच बीएस्सी,उमेदवार सायन्स,मँथेमँटिक्स घेऊन उत्तीर्ण असावा.)

ज्युनिअर कमिशन आँफिसर रिलीजस टिचर्स :

वय मर्यादा आपली 25ते 34 असणे गरजेचे असते.(पदवीधर इच्छुक उमेदवार त्याच्या धर्म आणि धार्मिक आचरणात पात्र असावा).

आर्मी एज्युकेशन काँर्प्स :

वय मर्यादा आपली 20 ते 25 असणे गरजेचे असते.(यात गृप अ आणि गृप ब असतात.)

गृप एक्स मधील उमेदवार एम सी ए,एम ए,बी एस्सी,बीसीए,बीए बीएड उत्तीर्ण असणे आवश्यक असते

 गृप वाय मधील उमेदवार हा बीएससी,बीसीए,बीए बीएस्सी(आयटी) बीड न करता उत्तीर्ण असावा लागतो.

 

OR JCO भरती करीता फिजिकल टेस्ट आणि रिटर्न टेस्ट देखील घेतली जात असते.
OR JCO भरती करीता फिजिकल फिटनेस टेस्ट 100 मार्काची असते.
ज्यात 1.6 किमी धावणे,पुल अप्स काढणे,बँलेंसिंग बिम,9 फुट खोल खड्डा इत्यादींचा समावेश असतो.

खालील पदधतीने गुण विभागणी केली जाते:

6 किलोमीटर धावायचे 60 मार्क असतात.
टाईमिंग मार्क 5 मिनिट आणि 30 सेकंदापेक्षा कमी असायला हवा.
पुल अप्स मारायचे 40 मार्क्स असतात.
बँलेन्सिंग बीम आणि 9 फुट खोल खड्डा हे केवळ उमेदवाराची पात्रता बघण्यासाठी असते याचे कोणतेही मार्क्स दिले जात नाहीत.मग ह्या सर्व चाचण्या झाल्यावर उमेदवाराला लिखित परिक्षा देखील द्यावे लागते.
भारतीय सैन्य हे फिजिकल अँबीलिटी टेस्ट आणि एस एस बी इंटरव्युहवर आधारीत अंतिम भरतीची प्रक्रिया पुर्ण करत असते.
शेवटची सिलेक्शन प्रोसेस झाल्यावर उमेदवारांना 49 आठवडयाची ट्रेनिंग दिली जाते.आणि मग ठरवलेल्या नुसार प्रत्येक निवडुन आलेल्या उमेदवाराला वेतन दिले जात असते.

solved 5
शिक्षात्मक Saturday 10th Dec 2022 : 11:48 ( 1 year ago) 5 Answer 7460 +22