चौकशी पत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

चौकशी पत्र म्हणजे काय?

मित्रांनो ज्यावेळी आपल्याला एखाद्या संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल किंवा चौकशी करावयाची असेल तर अशावेळी आपण संबंधीत जबाबदार व्यक्तीला चौकशी पत्र लिहितो.


चौकशी पत्र कसे लिहावे?

मित्रांनो, चौकशी पत्र कसे लिहावे? चौकशी पत्र लेखनाचे स्वरूप कसे असू शकते या बाबी आपण खालीलप्रमाणे पाहूया.

चौकशी पत्र लिहिताना प्रथम डाव्या बाजूला दिनांक लिहावा.
त्यानंतर आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहीत आहोत त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, कार्यालयाचे नाव, आणि पत्ता सविस्तर लिहावा.
त्याखाली एक ओळ सोडून विषय लिहावा.
विषय हा थोडक्यात व मुद्देसुद लिहावा.
त्यानंतर महोदय/महोदय, आदरणीय सर, सप्रेम नमस्कार अशा शब्दांनी पत्राला सुरूवात करावी.
आता पत्रामध्ये प्रथम आपला स्वतःचा परिचय द्यावा.
त्यानंतर आपल्याला हवी असलेली माहिती चा उल्लेख करावा.
माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करावी.
पत्र संपल्यावर एक ओळ सोडून उजव्या बाजूला आपला/आपली असे लिहून आपली सही करावी.
त्याखाली आपले संपूर्ण नाव व हुद्दा लिहावा.



चौकशी पत्र लेखनाचे मुद्दे

चौकशी पत्र लिहिताना आपण कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजे? चौकशी पत्र लेखनाचे मुद्दे काय काय असू शकतात? या सर्व बाबी आपण खाली पाहूया.

चौकशी पत्र लिहिताना आपण योग्य व्यक्तीलाच पत्र लिहीत आहोत की नाही याची खात्री करावी.
चौकशी पत्र हे विनंती पूर्वकाच लिहावी.
चौकशी पत्र लिहिताना सौम्य भाषेचा वापर करावा.
चौकशी पत्र लिहिताना कायदे, नियम याचाही उल्लेख करावा जेणेकरून समोरचा व्यक्ती तुमचे म्हणणे विचारात घेईल.
चौकशी पत्र थोडक्यात परंतु मुद्देसुद लिहावे.
ते देत असलेल्या सेवेची आणि आपल्याला हवी असलेल्या सेवेची माहिती सांगावी.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 4918 +22