तत्त्ववेत्त्यांच्या मते इतिहास म्हणजे काय?www.marathihelp.com

: इतिहास हा शब्द दोन अर्थांनी वापरण्यात येतो. इतिहास भूतकाळात क्रमाने घडलेल्या घटनांचा व विशेषतः मानवजातीच्या जीवनात (मानवी समाजात) घडलेल्या घटनांचा बनलेला असतो. ह्या अर्थाने इतिहास घडतो, घडत आलेला असतो. दुसऱ्या अर्थाने भूतकाळात घडलेल्या घटनांचे संगतवार निवेदन किंवा कथन म्हणजे इतिहास. ह्या अर्थाने, इतिहास सांगितला जातो किंवा लिहिला जातो. म्हणून ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ ह्या शब्दप्रयोगाने दोन भिन्न ज्ञानशाखांचा निर्देश होतो.

solved 5
ऐतिहासिक Monday 13th Mar 2023 : 12:49 ( 1 year ago) 5 Answer 13810 +22