तलाठी कार्यालय काय म्हणतात?www.marathihelp.com

तलाठी कार्यालय काय म्हणतात?

तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते.


तलाठी(हिन्दीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.
सुरुवात

दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल (हिन्दीत टोडरमल) नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पद निर्माण केले. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी (हिन्दीत पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली.
निवड

जिल्हा निवड मंडळ
नेमणूक करणारे

जिल्हाधिकारी
शैक्षणिक पात्रता

पदवी
तलाठ्याची कर्तव्ये

ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.

कार्यक्षेत्र
तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.



महाराष्ट्रातील तलाठी यांना अधिकार नसल्याने त्यांनी खालील ३६ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे.

वारस नोंदी प्रमाणपत्र, वारस नोंद पंचनामा, वारसाचा दाखला, वारस अहवाल, वंशावळ पंचनामा, रक्‍तनातेसंबंधाचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, अल्पभूधारक असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, एकत्र कुटुम्बाचे प्रमाणपत्र, विभक्‍त कुटुम्ब असल्याचा दाखला, विधवा-परित्यक्‍ता असल्याचा दाखला, पुनर्विवाह न केल्याचा दाखला, अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र, नगरपालिकेत हद्द असल्याचा, नसल्याचा दाखला, विद्युत जोडणीना हरकत दाखला, विद्युतपम्प असल्याचा वा नसल्याचा दाखला, मालकीच्या शेतात विहीर आहे किंवा नाही याचा दाखला, ५०० फुटाच्या आत विहीर असल्या-नसल्याचा दाखला, शेतातील वृक्षांबाबत, भिक्षुक नसल्याबद्दल, धर्मादाय संस्थांकडून मदत घेत असल्या-नसल्याबाबात, जातीचा दाखला, कायदेशीर सज्ञान- अज्ञान असल्याचा दाखला, चल-अचल सम्पत्तीचा दाखला, दोन नावांची व्यक्ती एकच असल्याबाबत, जमिनीच्या घराच्या चतुःसीमा. शेतजमीन नकाशा, जमिनीच्या किंमतीचा पंचनामा, बागायत प्रमाणपत्र, मयत व्यक्ती ही कुटुम्बातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचा दाखला, मयत व्यक्ती कुटुम्बप्रमुख असल्याचा दाखला,आदी ३६ प्रकारचे दाखले.

नियमाप्रमाणे आता तलाठी सातबारा उतारा ८ अ उतारा तसेच फेरफार उतारा याच्या प्रमाणित प्रती देतात.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:15 ( 1 year ago) 5 Answer 6439 +22