नागपूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे?www.marathihelp.com

नागपूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे?

जिल्ह्याच्या लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर 948 इतके असून साक्षरता दर 89.52% इतका आहे. 0-6 वर्षाच्या वयोगटात लिंग गुणोत्तर मात्र 931 इतका आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत 68.31% लोक शहरी भागात आणि 31.69% लोक ग्रामीण भागात राहतात. एकूण लोकसंख्येच्या 0.18% लोक बेघर असून रस्त्यावर राहतात.

2011 च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 46, 53, 171 इतकी होती. ही लोकसंख्या आयर्लंड देशाचा लोकसंख्ये इतकी आहे.

भारत देशाच्या एकूण 640 पैकी नागपूरच्या लोकसंख्येबाबत 29 वा क्रमांक येतो.

महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 4.14% इतकी लोकसंख्या नागपूर जिल्ह्यात राहते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 4.20% इतके होते.

जिल्ह्याची लोकसंख्या घनता जवळजवळ 470 / चौकिमी इतकी आहे, जी 2001 च्या जनगणनेत 411 / चौकिमी इतकी होती.

2001 ते 2011 च्या दशकात नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 14.39% या दराने वाढली.

जिल्ह्याच्या लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर 948 इतके असून साक्षरता दर 89.52% इतका आहे. 0-6 वर्षाच्या वयोगटात लिंग गुणोत्तर मात्र 931 इतका आहे.

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत 68.31% लोक शहरी भागात आणि 31.69% लोक ग्रामीण भागात राहतात. एकूण लोकसंख्येच्या 0.18% लोक बेघर असून रस्त्यावर राहतात.

नागपूर जिल्ह्यातील बहुसंख्य लोक हिंदू धर्मीय आहेत. एकूण लोकसंख्येच्या 75.08% इतके लोक हिंदू, 14.41% बौद्धधर्मीय, 8.41% मुस्लिम, 0.74% ख्रिश्चन, 0.44% सिख आणि उरलेले जैन
आणि कोणताही धर्म न पाळणारे लोक आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:33 ( 1 year ago) 5 Answer 3922 +22