पर्यावरणीय जैविक विविधता म्हणजे काय?www.marathihelp.com

जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं इ. म्हणजेच परीसंस्थेची विविधता. आणि एखाद्या जीवामध्ये/प्रजातीमध्ये ज्या उपजाती असतात त्याला जनुकीय विविधता म्हटले जाते. जसे, आंब्याच्या तोतापुरी, देवगड हापूस, रायवळ अशा उपजाती आहेत.

जैवविविधतेमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात – वन्य आणि पाळीव किंवा घरगुती. वन्य जैवविविधता म्हणजे जी झाडे-झुडपे, पशु-पक्षी-कीटक इ. जंगलात किंवा आपल्या आसपास मानवी मदतीशिवाय वर्षानुवर्षे अस्तित्वात आहेत अशी. यामध्ये जंगलातील वाघ-हरीण पण येतात आणि आपल्या अंगणा-परसातील पक्षी-साप-कीडे हे ही येतात. पाळीव किंवा घरगुती जैवविविधता म्हणजे असे जीव जे मानवाने स्वतःच्या उपयोगासाठी जोपासलेले आहेत व ज्यांची देखभाल मानावाद्वारे केली जाते. गाय-बैल, शेळ्या-मेंढ्या, कोंबडी तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि भाज्या.

जैवविविधतेचे स्वरूप हे अधिवासांवर अवलंबून असते. जंगलात आढळणारी जीवांची विविधता ही गवताळ रानात दिसून येणाऱ्या जैवविविधतेपेक्षा भिन्न असते. अधिवासानुसारच तेथील जीवांची जडणघडण होत असते. आणि या जीवांमुळेच अधिवासाचे संतुलनही राखले जाते.

solved 5
पर्यावरण Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1009 +22