पुढील पैकी कोण राज्याचे राज्यपाल नियुक्त करते?www.marathihelp.com

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.

भारतातील कार्यकाल:
सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.
मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते
राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.

भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता:
*ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
*त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
*ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा ती व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्यातरी सभागृहाची सभासद असेल तर तिने राज्यपाल पद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागतो.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 395 +22