पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची संख्या किती असते?www.marathihelp.com

पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची संख्या किती असते?

पूर्ण स्पर्धा (Perfect Competition) : पूर्ण स्पर्धा बाजारात असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असल्यामुळे कोणताही एक विक्रेता अथवा एक ग्राहक वस्तूंच्या किंमती नियंत्रण करू शकत नाही.

स्पर्धेचा पूर्ण अभाव असलेल्या बाजारात एकच विक्रेता असल्याने तो वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतो.पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. कारण या बाजारपेठेत ग्राहकांची व विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ग्राहकांचा विक्रेत्यांवर व विक्रेत्यांचा ग्राहकावर कोणताही परिणाम होत नाही .



पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ? 

स्पर्धेनुसार बाजाराच्या विविध प्रकारापैकी पूर्ण स्पर्धा हा अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा बाजार मानला जातो. ज्या बाजारात एकजिनसी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात अशा बाजारात पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. पूर्ण स्पर्धा ही काल्पनिक संकल्पना आहे . वास्तवात पूर्ण स्पर्धा आढळून येत नाही पूर्ण स्पर्धेची व्याख्या पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल .

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 7237 +22