बहुविध विचार करण्याची क्षमता म्हणजे काय?www.marathihelp.com

बहुविध विचार करण्याची क्षमता म्हणजे काय?

अमेरिकेतील संशोधक डॉ. हॉवर्ड गार्डनर यांना मात्र काही वेगळंच म्हणायचं होतं. त्यांनी बुद्धिमत्तासंबंधी मेंदूंवर सखोल संशोधन केलेले आहेत. अनेकांच्या मेंदूच्या संशोधनावरून ‘फ्रेम्स ऑफ माइन्ड’ (1983) या पुस्तकातून ‘बुद्धिमत्ता एक नसून त्या अनेक प्रकारच्या असतात,’ असं त्यांनी जगासमोर मांडलेल आहे.

प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असली तरी पेशींची रचना, त्यांची जुळणी ही वेगवेगळ्या प्रकारे झालेली असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. जन्मलेल्या प्रत्येक मुलात विशिष्ट क्षमता असतात. त्याच्या नैसर्गिक क्षमतांना संधी मिळाली की त्या खुलतात. पण त्याच्या नैसर्गिक क्षमतेच्या विरोधात काही करायला सांगितलं की त्याच्यावर ताण येतो. त्यामुळे गरज असते ती आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता ओळखण्याची.

डॉ. गार्डनर यांच्या ‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’ या सिद्धांतास मराठीत ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’ म्हटलेल आहे. बहुविध बुद्धीमत्ता हा हॉवर्ड गार्डनर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या क्षमतेबद्दल (तार्किक, दृश्य, संगीत इत्यादी) मांडलेला मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रबळ कौशल्ये असू शकतात आणि काही लोक असे असतात ज्यांच्याकडे नऊच्या नऊ बुद्धिमत्ता संतुलित स्वरूपात असतात.

हॉवर्ड गार्डनरने सुरुवातीला सात व नंतर दोन कौशल्यांची मांडणी केलेली आहे. त्यांच्या या यादीतील पहिल्या तीन क्षमतांना शाळांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते, पुढील तीन सामान्यत: कलेशी संबंधित असतात आणि शेवटच्या तीन हॉवर्ड गार्डनरला 'वैयक्तिक क्षमता’ वाटतात बहुविध बुद्धीमत्तेचे प्रकार पुढीलप्रमाणे:

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 5142 +22