भांडवल म्हणजे काय?www.marathihelp.com

भांडवल :
भविष्यातील उत्पादन वाढावे म्हणून मानवाने निर्माण केलीली उत्पादन-सामग्री. जमीन व श्रमिक यांच्याप्रमाणेच उत्पादनासाठी लागणारा एक आवश्यक घटक म्हणजे भांडवल. मात्र भांडवल म्हणजे उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन.

भांडवल म्हणजे संपत्तीचा असा भाग की जो उत्पादन प्रक्रियेसाठी वापरला जातो, उदा. कच्चा माल ,मशिनरी,उपकरणांसाठी लागणारे भांडवल

अर्थव्यवस्थेत भांडवला संदर्भात खालील संकल्पना वापरल्या जातात

१) अधिकृत भांडवल
२) विक्रीस काढलेले भांडवल
३) भरणा भांडवल
४) प्रदत्त भांडवल

भाग भांडवल
कुठलेही व्यापारी प्रतिष्ठान , कंपनी उभारण्यासाठी आर्थिक भांडवल आवश्यक असते. आधुनिक काळात अनेक लोक एकत्र येऊन भांडवल गोळा करतात आणि उद्योग सुरू करतात. प्रत्येकाच्या हिस्स्याला भाग भांडवल असे म्हटले जाते. व्यावहारिक सोयीसाठी ठराविक किंमतिचा एक भाग असतो . प्रत्येक भागधारक आपल्याकडे असणाऱ्या आर्थिक उपलब्धतेनुसार भाग विकत घेतो.प्रत्येक भागधारक हा उद्योगाचा मालक असतो. मालकीचे प्रमाण मात्र त्याच्याकडे असणाऱ्या भागांच्या संख्येवर ठरते. मिळणारा फायदा सर्व भागधारकांमध्ये , भागांच्या मालकीच्या प्रमाणात वाटला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 11:53 ( 1 year ago) 5 Answer 8195 +22