भारतामध्ये प्रशासकीय भरती कोण करते?www.marathihelp.com

भारतीय प्रशासकीय सेवा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा आय.ए.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.ए.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय पोलीस सेवा व भारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.ए.एस.ला भारताच्या लोकप्रशासनामध्ये असाधारण महत्त्व आहे. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या नागरी रचनेत बरीच महत्त्वाची पदे आय.ए.एस. अधिकारी सांभाळतात.

आय.ए.एस. अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन) केली जाते. संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय.ए.एस. अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात.

खालील काही प्रमुख पदे आय.ए.एस. अधिकारी भुषवितात:
आयकर अधिकारी
राजदूत व परराष्ट्रसचिव
केंद्र सरकारच्या विविध खात्यांतील सल्लागार
जिल्हा कलेक्टर
निवडणुक अधिकारी

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:40 ( 1 year ago) 5 Answer 3123 +22