भाषांचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखेत काय म्हणतात *?www.marathihelp.com

भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा न घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.)[४] आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते, याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय. अलीकडच्या काळात भाषाशास्त्र या शब्दाच्या ऐवजी भाषाविज्ञान हा शब्द प्रचलित आहे. त्याचे कारण म्हणजे शास्त्र या शब्दात तुम्हाला चिकित्सा करण्याची मुभा नाही. विज्ञानात ती मुभा आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 11:59 ( 1 year ago) 5 Answer 3847 +22