भूमी ही निसर्गाची काय आहे?www.marathihelp.com

भूमी ही निसर्गाची काय आहे?
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा स्थायूरूप भाग म्हणजे भूमी किंवा जमीन. भूमी ही नैसर्गिक संसाधने आणि इतर संसाधनांचा एक मुख्य स्रोत आहे. तिची प्राकृतिक रूपे वेगवेगळी आढळतात. उदा., पर्वतीय, पठारी, मैदानी, टेकड्यांनी व्याप्त, दऱ्याखोऱ्या, दलदलयुक्त इत्यादी.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा स्थायूरूप भाग म्हणजे भूमी किंवा जमीन. भूमी ही नैसर्गिक संसाधने आणि इतर संसाधनांचा एक मुख्य स्रोत आहे. तिची प्राकृतिक रूपे वेगवेगळी आढळतात. उदा., पर्वतीय, पठारी, मैदानी, टेकड्यांनी व्याप्त, दऱ्याखोऱ्या, दलदलयुक्त इत्यादी. तिच्यावर उष्ण, थंड, आर्द्र, कोरडे असे विविध हवामान आढळते. या भौगोलिक घटकांनुसार तेथील जीवसृष्टीमध्येही बदल दिसून येतात. भूमीवर वनस्पतींची वाढ होते, तसेच तिच्यापासून खनिज व जल संसाधन उपलब्ध होते, तिच्यावर विविध प्रकारांची बांधकामे करता येतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सु. २९% क्षेत्र भूमी संसाधनाने व्यापलेले आहे. त्याचे वितरण पुढीलप्रमाणे आहे : वने (२१%), झुडूप क्षेत्र (१९%), रुक्ष वने (१४%), गवताळ प्रदेश (९%), आर्द्रभूमी (०∙२%), कृषी क्षेत्र (११%), ओसाड प्रदेश (१४%), इतर (बर्फाच्छादित प्रदेश, पर्वत इ. १०∙५%) आणि तऱ्हेतऱ्हेच्या बांधकामाखालील क्षेत्र (घरे, उद्योग, रस्ते ०∙५%). भारतातील भूमी संसाधनाचे वितरण कृषी क्षेत्र (५२∙८%), वने (२३%), कायमस्वरूपी मळे (चहा, मसाले, फळे, अन्य उत्पादने ४∙२%), कुरणे (३∙५%) आणि इतर (१६∙५%) असे आहे.

भूमी हा एक उत्पादनाचा मूलभूत घटक आहे. मानवाला विविध प्रकारे भूमी उपयुक्त असते. भूमीची प्राकृतिक वैशिष्ट्ये तिच्या स्थानाशी निगडित असतात. जसे, अन्ननिर्मिती भूमीपासून होते, मग ती शेतीपासून असो किंवा शिकारीपासून असो. मात्र, या अन्ननिर्मिती प्रक्रियांत वेगवेगळ्या स्थानांनुसार वेगळेपणा असतो. भूमीच्या स्थानावर तिचे मूल्य आणि उपयोग अवलंबून असतो. तसेच स्थानानुसार मृदेचे गुणधर्म वेगळे असतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 4452 +22