महाराष्ट्र राज्यातील लोकसभा व किती खासदार निवडले जातात?www.marathihelp.com

संसदेच्या सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य म्हणतात. भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.


लोकसभेतील खासदार :

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌.हा काळ आणीबाणीच्या काळात वाढविता येतो.सध्या उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ८० खासदार आहेत.


राज्यसभेतील खासदार :

राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌.[

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 7785 +22