महाराष्ट्रात किती मंत्री आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) हे महाराष्ट्र राज्यासाठी घटनात्मक राज्य शासित प्राधिकरण आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. हे एक लोकशाही पद्धतीने निवडून चालणारे सरकार आहे, ज्यामध्ये दर ५ वर्षांनी २८८ आमदार विधानसभेवर निवडून जातात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन सभागृहे आहेत विधानसभा (कनिष्ट सभागृह) आणि विधान परिषद (वरिष्ट सभागृह). महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण ७८ आमदार आहेत, त्यापैकी ६६ आमदार हे निवडून तर १२ आमदार नामनिर्देशित असतात.[१] भारताच्या संसदीय व्यवस्थेप्रमाणेच कनिष्ट सभागृहात म्हणजेच विधानसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांचा गटच सरकार स्थापन करु शकतो. विधानसभेत बहुमताचे नेतृत्व करणारा नेताच मुख्यमंत्री बनतो आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यामधून मंत्रीमंडळाची नियुक्ती केली जाते आणि विविध मंत्रालयाचा कारोभार या मंत्र्यांकडे सोपवला जातो. निवडून न आलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यास, त्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहात निवडून येणे बंधनकारक असते.भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 401 +22