महाराष्ट्रात सर्वात जास्त कालावधीसाठी कोण मुख्यमंत्री होते?www.marathihelp.com

आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागील ६१ वर्षोंमध्ये 1९ मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री अर्थात काँग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास 50 वर्ष मुख्यमंत्री पद हे काँग्रेसकडे होते. तसेच आतापर्यंत विदर्भातून 4 मुख्यमंत्री निवडले गेले तर सर्वाधिक 6 मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातून निवडण्यात आले होते. महाराष्ट्रात दोनदा राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्यात आली होती.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागील 59 वर्षोंमध्ये 18 मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री अर्थात काँग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास 50 वर्ष मुख्यमंत्री पद हे काँग्रेसकडे होते. तसेच आतापर्यंत विदर्भातून 4 मुख्यमंत्री निवडले गेले तर सर्वाधिक 6 मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातून निवडण्यात आले होते. महाराष्ट्रात दोनदा राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्यात आली होती.1978 मध्ये काँग्रेस शासन निवडून आले. शरद पवार यांनी यावेळी पुलोद सरकारचे नेतृत्व केले होते. ते शासन बर्खास्त करुन त्याकाळी विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका घेण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपति शासन लागू करण्यात आले होते. तसेच 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी पक्ष काँग्रेसचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले व त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे वसंतराव नाईक राहिलेले आहेत. त्यांच्यानंतर कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच आपला मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. राज्यात शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र मुख्यमंत्री होऊन गेले.

आतापर्यंतचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाळ आणि पक्ष –

यशवंतराव चव्हाण – 1 मे, 1960 ते 19 नोव्हेंबर,1962 (काँग्रेस)

मारोतराव कन्नमवार 20 नोव्हेंबर,1962 ते 24 नोव्हेंबर,1963 (काँग्रेस)

पी.के. सावंत (काळजीवाहू) – 24 नोव्हेंबर, 1963 ते 4 डिसेंबर, 1963 (काँग्रेस)

वसंतराव नाईक – 5 डिसेंबर, 1963 ते 1 मार्च, 1967 (काँग्रेस)

वसंतराव नाईक – 1 मार्च, 1967 ते 13 मार्च, 1972 (काँग्रेस)

वसंतराव नाईक – 13 मार्च, 1972 ते 20 फेब्रुवारी, 1975 (काँग्रेस)

शंकरराव चव्हाण – 21 फेब्रुवारी, 1975 ते 16 एप्रिल, 1977 (काँग्रेस)

वसंतदाद पाटील – 17 एप्रिल, 1977 ते 2 मार्च, 1978 (काँग्रेस)

वसंतदाद पाटील – 7 मार्च, 1978 ते 18 जुलै, 1978 (काँग्रेस)

शरद पवार – 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद)

राष्ट्रपती राजवट – 17 फेब्रुवारी, 1980 ते 8 जून, 1980

अब्दुल रहमान अंतुले – 9 जून, 1980, 12 जानेवारी, 1982 (काँग्रेस)

बाबासाहेब भोसले – 21 जानेवारी, 1982 ते 1 फेब्रुवारी, 1983 (काँग्रेस)

शिवाजी पाटील निलंगेकर – 3 जून, 1985 ते 6 मार्च, 1986 (काँग्रेस)

शंकरराव चव्हाण – 12 मार्च, 1986 ते 26 जून, 1988 (काँग्रेस)

शरद पवार – 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस)

सुधाकरराव नाईक – 25 जून, 1991 ते 22 फेब्रुवारी, 1993 (काँग्रेस)

शरद पवार – 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

मनोहर जोशी – 14 मार्च, 1995 ते 31 जानेवारी, 1999 (शिवसेना)

नारायण राणे – 1 फेब्रुवारी, 1999 ते 17 ऑक्टोबर, 1999 (शिवसेना)

विलासराव देशमुख – 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी, 2003 (काँग्रेस)

सुशीरकुमार शिंदे – 18 जानेवारी, 2003 ते 30 ऑक्टोबर, 2004 (काँग्रेस)

विलासराव देशमुख – 1 नोव्हेंबर, 2004 ते 4 डिसेंबर, 2008 (काँग्रेस)

अशोक चव्हाण – 8 डिसेंबर, 2008 ते 15 ऑक्टोबर, 2009 (काँग्रेस)

अशोक चव्हाण – 7 नोव्हेंबर, 2009 ते 9 नोव्हेंबर, 2010 (काँग्रेस)

पृथ्वीराज चव्हाण – 11 नोव्हेंबर, 2010 ते 26 सप्टेंबर, 2014 (काँग्रेस)

राष्ट्रपती राजवट – 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014

भाजप चे श्री देवेन्द्रजी फडणवीस – 31 ऑक्टोबर, 2014 ते २०१९.

शिवसेनेचे श्री उध्दवजी ठाकरे २०१९ पासून सध्या विद्यमान आहेत.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 851 +22