राष्ट्रीय उत्पन्न मोजणाच्या प्रमुख पद्धती किती आहेत *?www.marathihelp.com

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा ?
प्रत्येक देशाचे विशिष्ट कालखंडात म्हणजेच एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते . हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पुढील तीन प्रकारच्या पद्धतींचा वापर केला जातो .

1] उत्पादन पद्धत [ production method ] :-
उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विशिष्ट कालखंडात देशात निर्माण झालेल्या सर्व वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य ( उदा. साखरेचे मूल्य निश्चित करतांना उसाचे मूल्य विचारात घेतले जात नाही. ) विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादनाची दुहेरी मोजणी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते . 
देशातील उत्पादन साधनांचा उत्पादनासाठी वापर करताना झीज होते . ही झीज किंवा घसारा खर्च वजा करून निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ठरविता येते . हे उत्पन्न वस्तू व सेवांच्या बाजार किमतीनुसार मोजले जाते . 


2] उत्पन्न पद्धती [ generating method ] :-
उत्पादन पद्धतीनुसार जे एकूण उत्पादन मिळते ते विकले असता जी प्राप्ती होते . ती वेगवेगळ्या घटकात विभागली जाते या घटकांच्या प्राप्तीची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मिळते .
ज्या देशात प्राप्तीकर भरणारे लोक जास्त आहेत . त्या देशात उत्पन्न पद्धतीचा वापर केला सोपे असतात थोडक्यात विशिष्ट कालखंडात व्यक्ती व संस्था यांना मिळणारे उत्पन्नाची बेरीज केली असता . उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करता येते . उत्पादन घटकांना मिळणारे मोबदल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते .


3] खर्च पद्धती [ spending method ] :-
खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तू व सेवा यांच्यावर केलेला एकूण खर्च विचारात घेतला जातो . त्यामध्ये कुटुंबाचे केलेला उपभोग खर्च , सरकारने केलेला वस्तू व सेवावरील खर्च , विदेशी नागरिकांवरील खर्च , उद्योगांवरील खर्च या सर्वांचा समावेश केला जातो. व राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते . 

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 14:09 ( 1 year ago) 5 Answer 8268 +22