लोकशाहीचा उदय सर्वप्रथम कुठे झाला?www.marathihelp.com

ब्राहम लिंकन यांची ‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ ही व्याख्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध आहे. लिंकन या संदर्भात पुढे म्हणतात, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही, तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्‌गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते.’ ‘बहुमतांचे राज्य’ असेही लोकशाहीचे वर्णन केले जाते. लोकशाहीचे साक्षात (प्रत्यक्ष) आणि प्रातिनिधिक (अप्रत्यक्ष) लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाही’ हा शब्दप्रयोग सामान्यपणे प्रातिनिधिक लोकशाही या अर्थानेच केला जातो तथापि स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोव देशांतून आजही साक्षात लोकशाहीचा प्रयोग काही प्रमाणात पाहावयास मिळतो. स्वित्झर्लंडमध्ये एकूण तीन हजार कम्यून असून सव्वीस कॅन्टन (घटक प्रदेश) आहेत. त्यांपैकी पाच कॅन्टनमध्ये वर्षातून काही दिवस सर्व नागरिक एकत्र जमतात. यावेळी सर्वच विधेयके चर्चेसाठी जनतेपुढे ठेवण्यात येतात आणि बहुमताने निर्णय घेतात. याशिवाय जनमतपृच्छा आणि उपक्रमाधिकार या प्रकारांनी प्रत्यक्ष लोकशाहीची उपयोजना इतर कॅन्टनमध्ये करण्यात आली आहे. ही पद्धत ऑस्ट्रेलियाच्या संविधानातही नमूद केलेली आहे परंतु तिचा प्रमुख्याने उपयोग संविधान दुरूस्तीच्या संदर्भातच करण्यात येतो.

लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तो एक राज्यघटनेचा व राज्यव्यवस्थेचा प्रकार आहे. सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेतून−अपरिहार्यतेतून जीवन व्यतीत करण्याच्या ज्या काही विचारप्रणाल्या आणि आचारधर्म प्रसृत झाले, त्यांपैकी लोकशाही ही एक आहे म्हणून समाज आणि संस्कृती यांना उद्देशून लोकशाही या शब्दाचा वापर करणे अर्थपूर्ण ठरते. समाज व संस्कृती यांचे वळण जर लोकशाहीपर नसेल, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड जाते. याउलट, एखाद्या देशात लोकशाही पद्धतीने दीर्घकाळ राज्यकारभार चालू असता, त्या देशातील समाजाला व संस्कृतीला लोकशाही वळण प्राप्त होते. अशा प्रकारे या दोन्हींमधील परस्परसंबंध स्पष्ट करता येतो.

उद्‌गम व विकास :
लोकशाहीस काही अंशी पूरक असे प्रयोग प्राचीन ग्रीसमधील नगरराज्यांत, विशेषतः अथेन्समध्ये, इ.स.पू. पाचव्या शतकात झाले. अथेन्समध्ये महत्त्वाचे निर्णय अंमलातआणणारी एक समिती होती. तिचे सभासद व राज्याचे अधिकारी लोकांकडून निवडले जात. न्यायनिवाडासुद्धा सर्व नागरिक एकत्र जमून करीत. मर्यादित लोकसंख्येमुळे साक्षात (प्रत्यक्ष) लोकशाही प्रयोग तत्कालीन काही नगरराज्यांत शक्य झाला. सभागृहातील सभासद महत्त्वाच्या सार्वजनिक विषयांवर चर्चा करीत आणि नंतर मत व्यक्त करीत. प्रत्येक नगरराज्याच्या घटनात्मक प्रगतीचे मूलप्रवाह आणि प्रातिनिधिक स्वरूप पाहिले असता असे दिसते की, या नगरांचे नागरिकत्वकाही थोड्या लोकांपुरतेच मर्यादित होते. स्त्रियांना आणि गुलामांना मतदानाचा अधिकार नव्हता. सर्व पदांवर अर्थातच उच्चकुलीन पुरूषांनाच निवडण्यात येई. त्यामुळे राजकीय अधिकार नसलेले लोक खुद्द नागरिकांपेक्षा कितीतरू पटींनी जास्त होते. या मर्यादा लक्षात घेऊनही अथेन्समधील लोकशाहीमध्ये लोकशाही राज्यपद्धतीची बीजे आढळतात तथापि सर्वच ग्रीक नगरराज्यांनी लोकशाहीचा स्वीकार केल्याचे दिसत नाही. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे दोन अथेनियन विचारवंत. प्लेटोने लोकशाहीला सैद्धांतिक तत्त्वांवर विरोध दर्शविला आहे. त्याच्या मते लोकांकडे आवश्यक असलेली नीतिमत्ता आणि बौद्धिक क्षमता नसेल, तर लोकशाही यशस्वी होणार नाही मात्र प्लेटो धनिकशाही किंवा हुकूमशाहीपेक्षा लोकशाही श्रेष्ठ आहे, असे स्पष्ट मत मांडतो. याउलट ॲसिस्टॉटलने या संकल्पनेला सहानुभूती दर्शविली आहे. त्याने राज्याचे वर्गीकरण तेथील सत्ताधाऱ्यांच्या सख्येवरून राजेशाही. उमरावशाही व लोकशाही असे केले आहे. लोकशाहीतील सत्तेचा उपयोग लोकहितार्थ केला जावा व नागरिकांनी प्रत्यक्षपणे राज्यकारभारात सहभागी व्हावे, अशी त्याची अपेक्षा होती. त्याने आपल्या राज्यशास्त्र ग्रंथात नागरिकांच्या शिक्षणाचा विचार मांडला असून कायद्याच्या राज्याला महत्त्व दिले आहे.

solved 5
General Knowledge Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1751 +22